TRENDING:

Pune Accident : गाडीच्या धडकेत मांजराच्या पिलाचा मृत्यू; पुण्यातील महिलेची थेट पोलिसात धाव अन् मोठी कारवाई

Last Updated:

४२ वर्षीय तक्रारदार महिलेचे पाळीव मांजराचे पिल्लू सोसायटीच्या आवारात फिरत होते. त्याच वेळी एका भरधाव वाहनाने पिलाला जोरदार धडक दिली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : मुक्या प्राण्यांच्या सुरक्षेबाबत पुण्यात एक मोठी कायदेशीर कारवाई समोर आली आहे. विश्रांतवाडी परिसरातील एका सोसायटीत भरधाव वाहनाच्या धडकेत पाळीव मांजराच्या पिलाचा मृत्यू झाला. आता याप्रकरणी पोलिसांनी संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. निष्काळजी वाहन चालवणाऱ्यांना हा एक मोठा इशारा मानला जात आहे.
गाडीच्या धडकेत मांजराच्या पिल्लाचा मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)
गाडीच्या धडकेत मांजराच्या पिल्लाचा मृत्यू (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

टिंगरेनगर येथील तिरुपती सोसायटीत ही घटना मंगळवारी, १७ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. येथील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय तक्रारदार महिलेचे पाळीव मांजराचे पिल्लू सोसायटीच्या आवारात फिरत होते. त्याच वेळी एका भरधाव वाहनाने पिलाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पिलाचा जागीच मृत्यू झाला.

बनेश्वर मंदिर परिसरात धक्कादायक घटना; मधमाशांचे पोळे काढायला मध्यरात्री झाडावर चढलेल्या तरुणाचा गेला जीव, काय घडलं?

advertisement

आपल्या लाडक्या मांजराच्या पिलाचा मृत्यू झाल्याने धक्का बसलेल्या महिलेने तातडीने विश्रांतवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक माने या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, सोसायटीतील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे अधिक पुरावे गोळा केले जात आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावर पैसे मागितले, पण शेवटी ठरवलं अन् ट्रान्सजेंडर मनस्वीनं करून दाखवलं, VIDEO
सर्व पहा

सोसायटीच्या आवारात वाहने जपून चालवणे किती गरजेचे आहे, हेच अशा अनेक अपघातांच्या घटनांमधून पुन्हा पुन्हा अधोरेखित झाले आहे. कधी प्राणी तर कधी लहान मुलांनी अशा घटनांमध्ये जीव गमावल्याचं अनेकदा समोर आलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident : गाडीच्या धडकेत मांजराच्या पिलाचा मृत्यू; पुण्यातील महिलेची थेट पोलिसात धाव अन् मोठी कारवाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल