याप्रकरणी आरोपी अमित बाळासाहेब पिसाळ (वय ३६, रा. कासारवाडी) याला दापोडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या सासूबाई यांनी या घटनेबाबत दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आपल्या मुलीला भेटण्यासाठी कासारवाडी येथे कारने गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी अमित पिसाळ याच्या भावाला आणि मित्रांना महिलेनं आपल्या कारमध्ये बसण्यास नकार दिला. हाच राग अमित पिसाळ याच्या मनात होता.
advertisement
ते आले, सिगरेट घेतली अन् कोयता काढून...पुण्यातील पान टपरीवरील घटनेचा थरकाप उडवणारा Video
मध्यरात्री या कारणावरून संतापलेल्या जावयाने सासूशी वाद घातला आणि तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ केल्यानंतर त्याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने महिलेचं डोकं भिंतीला आपटलं आणि तिच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. घटनेनंतर आरोपीला दापोडी पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. त्याच्यावर खुनी हल्ला आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. जावयाने सासूवर केलेल्या या विचित्र आणि भयंकर हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
