नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम व्हसुरे हा त्याचे मित्र प्रकाश माळी, अनिल ओवाळ आणि राहुल गायकवाड यांच्यासोबत राहुलच्या कारने राजगड तालुक्यातील माणगाव येथे फिरण्यासाठी गेला होता. तिथे प्रकाश माळी यांच्या सासुरवाडीला भेट दिल्यानंतर हे चौघे मित्र पानशेत धरणाच्या परिसरात आले. धरणाच्या कडेला बसून त्यांनी भेळ खाल्ली आणि सोबतच मद्यप्राशनही केले.
advertisement
नशेत धरणात मारलेली उडी ठरली शेवटची: मद्याच्या नशेत असताना सद्दामला पोहण्याचा मोह आवरला नाही. तो अचानक धरणाच्या खोल पाण्यात उतरला. मात्र, काही अंतर पोहून गेल्यानंतर त्याला दम लागला आणि तो पाण्यात बुडू लागला. सद्दामला बुडताना पाहून प्रकाश माळी याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. प्रकाशला पोहता येत असल्याने त्याने सद्दामला पाण्याच्या बाहेर काढले, मात्र तोपर्यंत सद्दाम बेशुद्ध झाला होता.
प्रियकरासोबत संबंध; अल्पवयीन मुलगी गर्भवती, ससूनमध्ये नेऊन आईनंच केलं असं कांड की पोलीसही शॉक
मित्रांनी तात्काळ पानशेत पोलीस दूरक्षेत्र गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सद्दामला वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथल्या डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे सद्दामच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोघे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी मद्यप्राशन करून धाडस करणे किती धोक्याचे ठरू शकते, हे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
