3 तोळं सोन्याचं मंगळसुत्र, 3 लाथ 93 हजाराच्या बांगड्या
सोनाली आंदेकरच्या प्रतिज्ञापत्रानुसार तिच्याकडे 62,150 रुपये कॅश स्वरुपात आहेत. सोनाली आंदेकरच्या इंडियन बॅकेमध्ये 23 लाख रुपये असल्याची माहिती समोर आलीये. तसेच यूनियन बँकेत 93,740 रुपये एवढंच नाही तर इंडियन बँकेतील आणखी एका खात्यात 10,000 रुपये आहेत. तसेच महेश महिला पतसंस्थेत 5-5 लाखाच्या चार ठेवी आहेत. त्याची किंमत 20 लाख होते. तसेच एक अॅक्टिवा गाडी आहे. सोनालीकडे 3 तोळं सोन्याचं मंगळसुत्र आणि 3 लाथ 93 हजाराच्या बांगड्या आहेत. वनराज असोसिएटस् या फर्ममध्ये दोन लाखाची गुंतवणूक देखील आहे.
advertisement
71 लाख 71 हजार रुपयांची मालमत्ता
एवढंच नाही तर सोनाली आंदेकरच्या नावावर 71 लाख 71 हजार रुपयांची मालमत्ता खरेदी देखील आहे. सोनाली आंदेकरच्या कुटूंबाचं वार्षिक उत्पन्न 62,150 रुपये दाखवण्यात आलंय. तर कुटूंबाची जंगम मालमत्ता 57,71,740 रुपये दाखवण्यात आला आहे. तसेच आंदेकर कुटूंबाची स्थावर मालमत्ता ही 71,71,217 रुपये दाखवण्यात आलीये. त्यामुळे सोनाली आंदेकरच्या कुटूंबाची एकूण मालमत्ता 1, 29,42,957 रुपये असल्याची माहिती समोर प्रतिज्ञापत्रानुसार समोर आली आहे.
कुटूंबाची संपत्ती 13865638 रुपये
दरम्यान, सोनाली आंदेकरच्या कुटूंबात फक्त दोन मुलं आणि मयत वनराज आंदेकरचा उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसरीकडे बंडू आंदेकरची पत्नी लक्ष्मी आंदेकर देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने तिच्या कुटूंबाची संपत्ती 1,38,65,638 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
