पिंपरी चिंचवड मधील एका भागात सर्पमित्र राजू कदम हे तस्कर जातीचा साप पकडण्यासाठी गेले होते. पोटात अंडी असल्याने सापाची गती मंदावली होती. त्याला पकडण्याच्या नादात लोकांनी त्याला इजा केल्याने त्याने त्या ठिकाणी 8 ते 10 अंडी दिली. तेव्हा कदम यांनी सापाची सुटका करून ती अंडी घरी आणली. त्या अंड्यांना तब्बल 51 दिवस विशिष्ट तापमानात ह्युमीडिटी बॉक्स तयार करून ठेवले.
advertisement
पती-पत्नीत होतंय भांडण? हे रत्न वापरा आणि बिनधास्त राहा
तब्बल 51 दिवस या अंड्यांचं संगोपन करून यातून ही 6 पिल्लं बाहेर निघाली. अविषारी समजल्या जाणाऱ्या व केवळ महाराष्ट्राच्या काही भागातच आढळणाऱ्या तस्कर सापांच्या पिलांना सर्पमित्र राजू कदम यांच्या अथक प्रयत्नाने जीवनदान मिळाले.
कसा असतो तस्कर साप ?
तस्कर हा अतिशय शांत स्वभावाचा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्करचा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा असा असतो. याची लांबी साधारणपणे 1 मीटर पर्यंत व जाडी 3 सेमी पर्यंत असते. रंगाने तपकिरी, बदामी, पिवळसर असतो. अंगावर पट्टे असतात. हे पट्टे बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढऱ्या चौकोनांनी भरलेले असतात. मानेवर इंग्रजी व्ही (v) किंवा दोन काळ्या समांतर रेघांची उठून दिसणारी मुद्रा असते. या सापाची मादी अंडी घालते, अशी माहिती सर्पमित्र राजू कदम यांनी दिली.