पती-पत्नीत होतंय भांडण? हे रत्न वापरा आणि बिनधास्त राहा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आपल्यासाठी ग्रहस्थिती अनुकूल राहावी म्हणून वेगवेगळी रत्नं परिधान केली जातात.
छत्रपती संभाजीनगर, 25 नोव्हेंबर : आपल्या सर्वांना आपल्या राशीमध्ये काय चाललं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यासोबतच आपले ग्रहतारे कसे आहेत त्यांची काय स्थिती आहे हे आपण सर्वजण जाणून घेत असतो. त्यावर उपाय म्हणून आपण वेगवेगळी रत्नं देखील परिधान करतो. बुधाचे पन्ना रत्न परिधान केल्यानंतर आपल्याला फायदे होतात असं सांगितलं जातं. या विषयी छत्रपती संभाजीनगर येथील ज्योतिषाचार्य उमेश कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
बुधाच्या पन्ना रत्नाचे फायदे
बुधाच्या पन्ना रत्नाचे आपल्याला अनेक फायदे होतात. या रत्नाला आपण मनी स्टोन देखील असे म्हणतो. पण हे रत्न मिथुन रास आणि कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत चांगलं असतं. त्यासोबत बुध ग्रहाचे शुभांक आहेत त्यांच्यासाठी देखील पन्ना रत्न अत्यंत फायदेशीर आहे. ज्या लोकांची जन्मतारीख ही पाच आहे किंवा त्यांच्या जन्म तारखेमध्ये पाच हा अंक येतो, अशा लोकांसाठी हे रत्न अत्यंत शुभ आणि फलदायी आहे.
advertisement
उपरत्नही फलदायी
पन्ना हे रत्न थोडसं महाग भेटतं. बाजारात या रत्नाची उपरत्नं देखील आहेत. ओनेक्स आणि पेरीडॉट हे पन्ना रत्नाचे उपरत्न आहेत. पेरीडॉट या उपरत्नाला मनी रत्न किंवा संपत्ती रत्न देखील म्हटलं जातं. यामध्ये मॅग्नेशियमचे अंश असतात. त्यासोबत लोखंड आणि सल्फरचे देखील अंश या पेरीडॉट उपरत्नामध्ये असतात. ज्यांच्या शरीरामध्ये याची कमतरता असेल हे रत्न परिधान केल्यानंतर त्यांची कमतरता पूर्ण होईल व त्यांचं आरोग्य देखील चांगले राहील. हे रत्न घातल्यामुळे आपली मानसिक स्थिती देखील सुधारते. डिप्रेशन दूर होतं. जर कोणाला डोकेदुखीचा त्रास असेल तर हे रत्न परिधान केल्यामुळे तो सुद्धा नाहीसा होतो, असे कुलकर्णी सांगतात.
advertisement
पती-पत्नीचे वाद मिटतात
जर पती-पत्नीमध्ये कोणते वाद असतील तर हे दोघांनी जर रत्न परिधान केलं तर हे वाद मिटतात. हे रत्न सर्वांनी घातले तर सर्वांना लाभदायी ठरतं. जर तुम्हाला याची टेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही आधी हे रत्न तुमच्या दंडावरती बांधून त्याचं शुद्धीकरण करून घ्यावं. 'ओम बुध बुधाय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गणपतीचे स्मरण करून आपल्या उजव्या दंडावरचे हा रत्न परिधान करावे. जर याचे तुम्हाला रिझल्ट आले तर हा खडा अंगठी मध्ये घालून करंगळी मध्ये परिधान करावा, असेही ज्योतिषाचार्य कुलकर्णी सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
November 25, 2023 10:12 AM IST