TRENDING:

घोड्याचा भाव ऐकून बसेल धक्का; किंमतीत येतील 7 मर्सिडीज-बेंझ, Video

Last Updated:

या प्रदर्शनामध्ये 7 मर्सिडीज-बेंझ कार खरेदी करता येतील एवढ्या किंमतीचा म्हणजेच सात कोटीचा अश्व पाहाला मिळाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 27 नोव्हेंबर: अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठ्या देशी गोवंश व अश्व पशू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये 7 मर्सिडीज-बेंझ कार खरेदी करता येतील एवढ्या किंमतीचा म्हणजेच सात कोटीचा अश्व पाहाला मिळाला. तो दिसतो कसा? हे पाहण्यासाठी यावेळी अक्षरश: पशू प्रेमींची झुंबड उडालीलेली होती.
advertisement

मूळचा राजस्थानी असलेल्या या घोड्याचं नाव आहे फ्रेंजेड जी. हा मारवाडी प्रकारचा घोडा आहे. फ्रेजेंडचा खुराक जाणून तुम्हालाही धक्का बसेल. घोडा मालक युवराज जडेजाने सांगितले की, हा घोडा 15 लीटर दूध पितो. दररोज 5 किलो हरभरा आणि 5 किलो डाळी खातो. आणि हो फक्त मिनरल वॉटरच पितो. फ्रेजेंड हाइब्रिड घोडा आहे.

advertisement

तस्कर सापाशिवाय जन्मली पिले, पुण्यातील सर्पमित्रानं कशी केली किमया? Video

फ्रेजेंडचे वडील राजस्थानी, तर आई रत्नागिरी प्रजातीची आहे. तो 4 वर्षांचा असून गेल्या दीड वर्षांपासून युवराजसोबत आहे. फ्रेजेंडने आतापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच तब्ब्ल 1100 हुन स्पर्धांमध्ये तो विजेता ठरला आहे. आजपर्यंत एकाही घोड्याने त्याचा पराभव केलेला नाही.

advertisement

दुर्गवेडा कोल्हापूरकर, स्वेच्छा निवृत्ती घेतली अन् सर केले तब्बल 1100 किल्ले

कोण आहेत युवराज जडेजा?

युवराज हे व्यवसायाने जमीनदार आणि आडतदार आहेत. ते गुजरातचे रहिवासी आहेत. फ्रेंजेडच्या देखभालीवर दरमहा अडीच ते तीन लाख रुपये खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले. घोड्याची काळजी घेण्यासाठी चारजण नेहमी सोबत राहतात. घोड्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी खास रुग्णवाहिकेसारखी गाडी असते. घोड्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 तास एक डॉक्टरही तैनात असतो.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
घोड्याचा भाव ऐकून बसेल धक्का; किंमतीत येतील 7 मर्सिडीज-बेंझ, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल