पुण्याचा पहिला निकाल किती वाजता?
१५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, १६ जानेवारी रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार असून, यामध्ये ४० प्रभाग हे चार सदस्यीय आहेत. निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फेरीसाठी साधारण ३० मिनिटांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात साधारण ११.३० वाजेच्या सुमारास पहिला निकाल हाती येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
१३ प्रभागांचे निकाल सर्वात आधी
सर्वात कमी फेऱ्या असलेल्या १३ प्रभागांचे निकाल सर्वात आधी जाहीर होतील. बिबवेवाडी, कसबा विश्रामबाग आणि कोंढवा-येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी १२ फेऱ्या होणार असल्याने, येथील चित्र लवकर स्पष्ट होईल. मात्र, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये सर्वाधिक २० फेऱ्या होणार आहेत. या ठिकाणी पाचसदस्यीय प्रभागाचा समावेश असल्याने मतमोजणीसाठी अधिक वेळ लागणार आहे. प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज या भागात १० फेऱ्या होणार असून तिथे निकालाला विलंब होऊ शकतो.
महापालिकेचे निवडणूक उपायुक्त म्हणाले...
पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी नियोजनाबाबत बोलताना महापालिकेचे निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, मतमोजणीसाठी एका फेरीला साधारण ३० मिनिटांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे १६ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीचा पहिला निकाल सकाळी ११.३० वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, दुपारपर्यंत म्हणजेच साधारण ३.३० ते ४.०० वाजेपर्यंत संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल, असेही काटकर यांनी स्पष्ट केले.
