TRENDING:

पुणे महापालिका vs जलसंपदा विभाग: पाण्याचा वाद विकोपाला! आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

हा वाद प्रामुख्याने पाणीपट्टीच्या दरावरून आहे. महापालिका नागरिकांच्या घरगुती वापरासाठी पाणी उचलते, ज्याचा दर कमी असतो. मात्र, जलसंपदा विभाग हे पाणी 'औद्योगिक वापरा'साठी दिले जात असल्याचा दावा करून अव्वाच्या सव्वा दराने बिल आकारत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावरून महापालिका आणि जलसंपदा (पाटबंधारे) विभाग यांच्यात जुंपली आहे. कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीवरून पाटबंधारे विभागाने शहराचा पाणीपुरवठा तोडण्याचा इशारा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. या गंभीर पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी आता मुख्यमंत्री लवकरच विशेष बैठक घेणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
पाण्याचा वाद विकोपाला! (फाईल फोटो)
पाण्याचा वाद विकोपाला! (फाईल फोटो)
advertisement

वादाचे मुख्य कारण काय?

हा वाद प्रामुख्याने पाणीपट्टीच्या दरावरून आहे. महापालिका नागरिकांच्या घरगुती वापरासाठी पाणी उचलते, ज्याचा दर कमी असतो. मात्र, जलसंपदा विभाग हे पाणी 'औद्योगिक वापरा'साठी दिले जात असल्याचा दावा करून अव्वाच्या सव्वा दराने बिल आकारत आहे. व्यावसायिक दराने बिल आकारल्याने मोठी थकबाकी निर्माण झाली असून, त्यावर पाटबंधारे विभाग १० टक्के दंडाचीही आकारणी करत आहे. यामुळे थकबाकीचा आकडा फुगला असून महापालिकेने या अन्यायाविरोधात जल प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे.

advertisement

पुणेकरांनो, खुशखबर! आता थेट खेड-शिवापूरपर्यंत धावणार मेट्रो; कात्रजमार्गे 'रिंग रोड'ला जोडणारा मेगा प्लॅन

समान पाणीपुरवठा योजनेसाठी पाईपलाईन टाकतानाही पाटबंधारे विभाग अडवणूक करत असल्याचा आरोप आहे. मित्रमंडळ चौकातील कामासाठी चक्क १० कोटी रुपयांची मागणी केली जात असून, त्याशिवाय 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) देण्यास नकार दिला जात आहे.

भविष्यातील नियोजन:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Summer Recipe: उन्हाळ्यात काहीतरी चवदार खायचंय? झटपट बनणाऱ्या या कांदा चटणीपुढे पनीरही फिकं, VIDEO
सर्व पहा

शहरातील पाण्याचे नियोजन अधिक शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या (World Bank) मदतीने तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. यामुळे गळती रोखणे आणि अचूक पाणीपट्टी मोजणे सोपे होईल. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दराचा हा तांत्रिक मुद्दा सुटल्यास पुणेकरांवरील पाणी कपातीचे टांगते संकट दूर होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुणे महापालिका vs जलसंपदा विभाग: पाण्याचा वाद विकोपाला! आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल