पुणेकरांनो, खुशखबर! आता थेट खेड-शिवापूरपर्यंत धावणार मेट्रो; कात्रजमार्गे 'रिंग रोड'ला जोडणारा मेगा प्लॅन
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचा विस्तार आता थेट खेड-शिवापूर टोलनाका परिसरातील प्रस्तावित 'रिंग रोड'पर्यंत केला जाणार आहे.
पुणे: पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक ऐतिहासिक क्रांती घडवणारा निर्णय घेण्यात आला आहे. स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचा विस्तार आता थेट खेड-शिवापूर टोलनाका परिसरातील प्रस्तावित 'रिंग रोड'पर्यंत केला जाणार आहे. या कामाला शहर सुधारणा समितीने शुक्रवारी (दि. २०) अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दक्षिण पुण्याचा चेहरामोहरा बदलणार असून वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे.
वाढत्या वसाहती आणि वाहतुकीचा ताण
पुणे शहराचा विस्तार झपाट्याने दक्षिणेकडे होत आहे. कात्रज, आंबेगाव, दरी पूल आणि खेड-शिवापूर या परिसरात मोठ्या गृहप्रकल्पामुळे लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. सध्या या भागातील नागरिकांना स्वारगेट किंवा शहराच्या मध्यवर्ती भागात येण्यासाठी तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हाच ताण लक्षात घेऊन मेट्रो मार्ग वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
advertisement
काय होईल फायदा?
शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांनी बैठकीनंतर माहिती दिली की, "मेट्रोचा हा विस्तार केवळ प्रवासाचा वेळ वाचवणार नाही, तर तो पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा एक भक्कम पर्याय ठरेल."मेट्रो मार्ग प्रस्तावित रिंग रोडला जोडला गेल्यामुळे शहराबाहेरून येणारी वाहतूक शहरात न येता मेट्रोच्या माध्यमातून विभागली जाईल. या विस्तारामुळे भविष्यातील शहरी नियोजनाला आणि उपनगरांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. कात्रज घाटातील आणि हायवेवरील धोकादायक प्रवास टाळून नागरिक सुरक्षितपणे मेट्रोने प्रवास करू शकतील.
advertisement
लवकरच या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (DPR) तयार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. यामुळे आता स्वारगेटहून बसऐवजी थेट मेट्रोने शिवापूर गाठण्याचे पुणेकरांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 11:32 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, खुशखबर! आता थेट खेड-शिवापूरपर्यंत धावणार मेट्रो; कात्रजमार्गे 'रिंग रोड'ला जोडणारा मेगा प्लॅन







