तरीही पुण्यातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. पुण्यातील हडपसर, फुरसुंगी, कोंढवा, कोथरुड आणि कात्रज परिसरात अनेक छोट्या मोठ्या गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत. हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न या टोळ्यांकडून केला जातोय. अशाच प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. पोलिसांनी टोळीला दहशत माजवल्याच्या ठिकाणी घेऊन जात ठोकून काढलं आहे.
advertisement
पोलिसांनी कोयता गँगमधील आरोपींना नागरिकांसमोर ऑन कॅमेरा फटके दिले आहेत. त्यांनी रस्त्याच्या बाजुला पडदा लावून एका एका आरोपीला पडद्याआड घेऊन जात लाकडी दांड्याने फडके दिले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरं तर, पुण्यात विविध प्रकरणात गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी त्यांची धिंड अनेकदा काढली आहे. मात्र तरीही गुन्हेगार सुधरताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी आता थेट नागरिकांसमोरच चोप देण्याचा पर्याय अवलंबला आहे. एवढंच नव्हे तर पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावर देखील चालायला लावलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी फुरसुंगीच्या आदर्शनगर परिसरात २० ते २५ गाड्यांची तोडफोड केली होती. आरोपींनी हातात कोयते घेऊन गाड्या फोडल्या होत्या. यात चार चाकी वाहनं, रिक्षा आणि काही टूव्हिलरचा समावेश होता. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. यानंतर त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी थेट नागरिकांसमोरच गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना चोप दिला आहे.
