पुणे : शहरातील नाना पेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकर या तरुणाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या बंडू आंदेकर कुटुंबातील चौघांना पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक केली. आज या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. आज कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान बंडू आंदेकर आणि कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
आयुष कोमकर हत्या प्रकरणात शिवराज , शुभम , अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकर यांना गुन्हे शाखेने आज न्यायालयात हजर केलं.. पोलिसांनी गुजरातमध्ये धडक देऊन यांना अटक केली होती. या चौघांना ही १८ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आला आहे. . तर आरोपी असलेले अमन पठण, सुजल मिरगु, वृंदावणी वाडेकर आणि तिच्या पोराने देखील पोलीस करत असलेल्या कथित अत्याचाराचा पाढा वाचला. आम्हाला मारहाण पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर कोर्टाने आरोपींना मुलभूत सुविधा द्यावे, अशी ताकीद पोलिसांना दिली.
advertisement
बंडू आंदेकर काय म्हणाला?
बंडू आंदेकर कोर्टात म्हणाला, तपास अधिकारी मला सतत धमकी देत आहे. पोलीस अधिकारी शैलेश संखे हे माझ्या लहान मुलाला म्हणजे कृष्णाला हजर होण्यास सांग नाहीत आम्ही गोळ्या घालतो, अशी धमकी सातत्याने देत आहे.
आम्हाला पोलिसांनी बेदम मारहाण केली
तर इतर आरोपी म्हणाले, पोलीस आमचा छळ करत आहेत. आम्हाला अंघोळ करू देत नाहीत, ब्रश करून देत नाहीत, असं चार ते पाच दिवस झाले सुरू आहे. आम्हाला बेदम मारहाण केली आणि कागदावर सही करायला लावली. त्या कागदात काय लिहिलं आहे वाचू पण दिलं नाही. सहीसाठी आम्हाला खूप मारहाण देखील केली.
सरकारी वकील काय म्हणाले?
आरोपींना अटक केली आहे. शस्त्र कुठून आणले, कुणी पुरवले आर्थिक मदत कुणी केली याचा तपास करायचा आहे. यासाठी पोलीस कस्टडीची गरज आहे, असं सरकारी वकील म्हणाले. त्यावर आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
कोर्ट काय म्हणाले?
सर्व आरोपींना मूलभूत सुविधा देण्यात यावी, असे आदेश कोर्टाने दिले.
आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या
काही दिवसांपूर्वी 19 वर्षीय आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या गेल्या वर्षी झालेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी केल्याचा पोलिसांना संशय आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येमध्ये आयुषचे वडील गणेश कोमकर हे आरोपी आहेत. आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी या हत्येमागे आयुषचे आजोबा आणि कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचा हात असल्याचा आरोप केला होता.