वीज का बंद राहणार?
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती विभागांतर्गत २२/११ केव्ही क्षमतेच्या नवी पेठ आणि तक्षशिला उपकेंद्रांसह तरुण भारत आणि विठ्ठलवाडी या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वीची तयारी आणि यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी ही नियोजित दुरुस्ती अनिवार्य असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणत्या भागांवर परिणाम होणार?
मध्यवर्ती पेठा: सदाशिव पेठ, नवी पेठ आणि आसपासचा परिसर.
advertisement
सिंहगड रस्ता: नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड), विठ्ठलवाडी परिसर.
उपनगरे: नऱ्हे, आंबेगाव आणि धायरीचा काही भाग.
संस्था: या भागातील तरुण भारत आणि तक्षशिला वीजवाहिन्यांवर अवलंबून असलेले व्यावसायिक संकुल आणि निवासी सोसायट्या.
नागरिकांना आवाहन
सलग ७ तास वीज नसल्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि गृहिणींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी सकाळी १०:३० पूर्वी सर्व गॅजेट्स जसं की मोबाईल, लॅपटॉप पूर्ण चार्ज करून ठेवावेत. गृहनिर्माण सोसायट्यांनी पाण्याचे पंप वीज जाण्यापूर्वीच चालवून टाकी भरून घ्यावी. इन्व्हर्टरची बॅटरी तपासून घ्यावी जेणेकरून तातडीच्या कामात अडथळा येणार नाही. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच सायंकाळी वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला जाईल, असे पर्वती विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळवले आहे.
