मोशी (ता. हवेली) येथील इंद्रायणी कॉलनीतील शिवालय अपार्टमेंटमध्ये राहणारे परदेशी हे मानसिक तणावात होते की अन्य काही कारणास्तव त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
हस्तांदोलनाच्या बहाण्याने हात हातात घेतला अन्...; लोणावळ्यात शिवसैनिकासोबत घडला धक्कादायक प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापक परदेशी हे बुधवारी (२४ डिसेंबर) दुपारी महाविद्यालयातून आपली दुचाकी घेऊन निघाले होते. मात्र ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास खेडच्या पश्चिम पट्ट्यातील मंदोशी येथील भैरवनाथ मंदिराजवळ त्यांची दुचाकी आणि काळ्या रंगाची बॅग स्थानिक नागरिकांना बेवारस स्थितीत आढळली. अधिक शोध घेतला असता, मंदिराशेजारील विहिरीच्या काठावर त्यांच्या चपला दिसून आल्याने संशय बळावला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शुक्रवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थ आणि जीवरक्षक यांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. तेव्हा विहिरीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. महाविद्यालयातील एक अनुभवी आणि आदरणीय प्राध्यापक अशा प्रकारे बेपत्ता होऊन त्यांचा मृतदेह सापडल्याने राजगुरुनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, त्यांच्या या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचे सहकारी आणि नातेवाईकांची चौकशी केली जाणार आहे.
