TRENDING:

Pune Traffic: पुणेकरांना, घराबाहेर पडण्याआधी हे बघा; आज शिवजयंतीनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल, कोणते रस्ते बंद?

Last Updated:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज (१९ फेब्रुवारी) शहराच्या मध्यभागात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज (१९ फेब्रुवारी) शहराच्या मध्यभागात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे.
वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
advertisement

बदल झालेले प्रमुख रस्ते

बुधवार पेठेतील हुतात्मा चौकातून सुरू होणारी ही मिरवणूक शिवाजीनगर येथील मिलिटरी स्कूल (SSPMS) येथे विसर्जित होईल. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत खालील रस्त्यांवर परिणाम होईल:

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता

बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्ता

टिळक रस्ता आणि कुमठेकर रस्ता

पं. जवाहरलाल नेहरू रस्ता

पर्यायी मार्ग आणि वळवण्यात आलेली वाहतूक

advertisement

वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

स्वारगेटकडे जाण्यासाठी: शिवाजी महाराज रस्त्याऐवजी जंगली महाराज रस्ता, स. गो. बर्वे चौक, झाशीची राणी चौक आणि खंडोजीबाबा चौक मार्गे टिळक रस्त्याचा वापर करावा.

गणेश रस्ता आणि जिजामाता चौक: येथील वाहतूक दारुवाला पूल मार्गे वळवण्यात आली आहे.

शिवाजीनगरकडे जाण्यासाठी: पूरम चौकातून बाजीराव रस्त्याऐवजी टिळक रस्ता आणि डेक्कन जिमखाना मार्गे प्रवास करावा.

advertisement

नारायण पेठ मार्ग: केळकर रस्त्याने बाजीराव रस्त्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी नारायण पेठ मार्गे इच्छितस्थळी जावे. तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाचा वापर शिवाजीनगरकडून ये-जा करण्यासाठी करता येईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
...तर खरी शिवजयंती साजरी होईल, शिव व्याख्याते बांगर यांचं परखड भाष्य, Video
सर्व पहा

मिरवणुकीत 'स्वराज्य रथांची' संख्या मोठी असल्याने नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिरवणूक पूर्णपणे ओसरल्यानंतरच हे रस्ते पुन्हा सर्वसामान्य वाहतुकीसाठी खुले केले जातील.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: पुणेकरांना, घराबाहेर पडण्याआधी हे बघा; आज शिवजयंतीनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल, कोणते रस्ते बंद?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल