TRENDING:

पुणेकरांनो, आता ATM मधून पैसे काढतानाही जरा जपून, तरुणासोबत रात्रीच्या अंधारात घडली भयंकर घटना

Last Updated:

१ जानेवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास तो आपल्या एका मित्रासह शिवाजीनगरमधील श्री म्हसोबा मंदिराजवळील एका एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. तेव्हाच ही धक्कादायक घटना घडली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजीनगर परिसरात लुटमारीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एटीएममधून पैसे काढून बाहेर पडणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून दोन चोरट्यांनी त्याच्याकडील २८ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
लुटमारीची धक्कादायक घटना (AI Image)
लुटमारीची धक्कादायक घटना (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

तक्रारदार तरुण हा कसबा पेठ परिसरात राहतो. १ जानेवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास तो आपल्या एका मित्रासह शिवाजीनगरमधील श्री म्हसोबा मंदिराजवळील एका एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. एटीएममधून पैसे काढून जसा तो बाहेर पडला, त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवले.

मारहाण करून रोकड लंपास

advertisement

चोरट्यांनी काहीही विचारण्यापूर्वीच तरुणाला आणि त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तरुण भांबावून गेला. याचाच फायदा घेत चोरट्यांनी बळजबरीने त्याच्या खिशातील २८ हजार रुपयांची रोकड काढून घेतली आणि दुचाकीवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. भरवस्तीत आणि मुख्य रस्त्याजवळ घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

advertisement

पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मुलांचे कपडे फक्त 150 रुपयांपासून करा खरेदी, कल्याणमधील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

याप्रकरणी पीडित तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध लूटमार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, चोरटे कोणत्या दिशेला पळाले याचा शोध पोलीस घेत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, आता ATM मधून पैसे काढतानाही जरा जपून, तरुणासोबत रात्रीच्या अंधारात घडली भयंकर घटना
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल