पुण्यातील स्वारगेट बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली. कोर्टात हजर केल्यानंतर दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दत्ता गाडे याला शिरुरमधून त्याच्या मुळगावातून अटक करण्यात आली होती. आरोपी दत्ता गाडेला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याच्या वकिलांनी त्याच्या बचावासाठी अनेक दावे केले होते.
आरोपीच्या वकिलांनी काय म्हटले?
advertisement
कोर्टात सुनावणीच्या दरम्यान वकिलांनी दावा केला होता की, पीडित तरुणी आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांची ओळख एक महिन्यापूर्वी स्वारगेट बस डेपो मध्ये झालेली होती. आरोपीने तिला कुठलीही बळजबरी केलेली नाही. ती स्वतः म्हटल्यानंतर आम्ही बसमध्ये गेलो. आरोपीकडून 7500 रुपये तरुणीने घेतले. त्याठिकाणी त्या तरुणीचा एजंटही असल्याची माहिती आपल्याला आरोपीने दिली असल्याचे वकिलांनी कोर्टात सांगितले. दोघांमध्ये पैशांचा वाद होता. त्यामुळे तरुणीने बलात्काराचा आरोप केल्याचा दावा वकिलांनी केला.
पोलीस तपासात वकिलाच्या दाव्याची हवा निघाली!
पैशांचा व्यवहार झाल्याची माहिती कोर्टाला आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी दिली. आरोपी दत्ता गाडेने पीडित तरुणीला पैसे दिल्याचा वकीलांचा दावा खोटा निघाला आहे. मागील तीन महिन्यांपासून आरोपीच्या बँक खात्यावर फक्त 239 रूपयेच जमा आहे. आरोपी दत्ता गाडे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. चोऱ्या करून जगणाऱ्या आरोपीच्या पैसे देण्याच्या वकीलाच्या दाव्याची हवाच पोलिसांनी तपासात काढली आहे.
जीवे मारायची धमकी देऊन बलात्कार...
दरम्यान, पीडित तरुणीचा जबाब समोर आला आहे. आरोपी दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची धमकी दिली होती. तरुणीचे फलटणला जायचे तिकीट ही पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केलं होतं. मुलीने प्रतिकार केला नसल्याच पोलिस उपायुक्त आणि गृहराजमंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र आरडाओरडा केल्याचा पीडितेनं जबाब दिला. एसी एसटीला खिडक्या नसल्याने बाहेर आवाज येत नसल्याचंही निष्पन्न झालं. पोलिसाकडून बसमध्ये चढून आवाज बाहेर येतो की नाही याची ही तपासणी करण्यात आली.
