'दादा मला मारु नकोस', स्वारगेटच्या नराधमाने कसा डाव साधला? पीडितेने आपल्या जबाबात सगळं सांगितलं...
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून तरुणीने केली आरोपी दत्ता गाडेला विनंती दादा मला जीवे मारू नको अशी विनंती केली होती.
पुणे, प्रतिनिधी वैभव सोनवणे: स्वारगेट एसटी स्टँडवरील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार केलेल्या तरुणीने पोलिसांना दिलेला जबाब अखेर समोर आला आहे. तरुणीनं आरोपीकडे हात जोडून याचना केली होती. बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून तरुणीने केली आरोपी दत्ता गाडेला विनंती दादा मला जीवे मारू नको अशी विनंती केली होती.
दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची धमकी दिली होती. तरुणीचे फलटणला जायचे तिकीट ही पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केलं होतं. मुलीने प्रतिकार केला नसल्याच पोलिस उपायुक्त आणि गृहराजमंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र आरडाओरडा केल्याचा पीडितेनं जबाब दिला. एसी एसटीला खिडक्या नसल्याने बाहेर आवाज येत नसल्याचंही निष्पन्न झालं. पोलिसाकडून बसमध्ये चढून आवाज बाहेर येतो की नाही याची ही तपासणी करण्यात आली.
advertisement
वैद्यकीय समुपदेशक असल्याने वेस्ट बंगालच्या घटनेप्रमाणे आपल्याला ही मारून टाकतील अशी पीडीतेला होती भीती. त्यामुळेच दादा मारू नको अशी विनंती पीडितेनं आरोपीकडे केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला. दुसरीकडे आरोपी निर्दोष असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी करत पीडितेवर अत्यंत गंभीर आरोप लावले होते. त्यापैकी वकिलांनी केलेला एक दावा खोटा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यामुळे वकिलाच्या दाव्यातली हवाच काढली गेली.
advertisement
आरोपी दत्ता गाडेने पीडित तरुणीला पैसे दिल्याचा वकीलांचा दावा खोटा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपीचे बँक स्टेटमेंट देखील पोलिसांनी पडताळून पाहिले. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीच्या खात्यावर केवळ 239 रुपये शिल्लक होते. त्यामुळे वकिलाने केलेला दावा हा खोटा असल्याचं समोर आलं. चोऱ्या करून जगणार्या आरोपीच्या पैसे देण्याच्या वकीलाच्या दाव्याची हवाच पोलिस तपासात निघाली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 03, 2025 8:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'दादा मला मारु नकोस', स्वारगेटच्या नराधमाने कसा डाव साधला? पीडितेने आपल्या जबाबात सगळं सांगितलं...










