TRENDING:

Pune Traffic: चाकण-तळेगावची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मास्टर प्लॅन तयार, डेडलाईन ठरली!

Last Updated:

Pune Traffic: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली चाकण–तळेगाव परिसरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: जिल्ह्यातील चाकण ते तळेगाव या औद्योगिक परिसरात विविध कंपन्या आणि लहान मोठे उद्योग असल्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या परिसरात दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही वाहतूक कोंडी नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) तब्बल 437 कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
Pune Traffic: चाकण-तळेगावची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मास्टर प्लॅन तयार, डेडलाईन ठरली!
Pune Traffic: चाकण-तळेगावची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मास्टर प्लॅन तयार, डेडलाईन ठरली!
advertisement

चाकण आणि तळेगाव एमआयडीसी औद्योगिक पट्ट्यात देशातील नामांकित कंपन्या आणि उद्योग कार्यरत आहेत. त्यामुळे या परिसरात दररोज हजारो कामगार व कर्मचारी कामासाठी ये-जा करतात. त्याचबरोबर मालवाहू ट्रक, कंटेनर वाहने आणि खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परिणामी वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वाहतूक तज्ज्ञांच्या सहाय्याने एक व्यापक वाहतूक सुधारणा आराखडा तयार केला आहे.

advertisement

बाणेर-शिवाजीनगर गाठा सुसाट! दुमजली उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला, मुहूर्त कधी?

या गोष्टींची सुधारणा करण्यात येणार

View More

या आराखड्यानुसार प्रमुख मार्गांचे रुंदीकरण, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, सेवा रस्त्यांची उभारणी तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गांना जोडणाऱ्या मार्गांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. काही ठिकाणी चार ते सहा पदरी रस्ते विकसित केले जाणार असून, जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गांची योजना आखण्यात आली आहे.

advertisement

यासोबतच, वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौकांचे पुनर्रचना काम हाती घेण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार असून, वाहतूक नियंत्रणासाठी विविध पूरक उपाय राबवले जाणार आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठी सशक्त ड्रेनेज व्यवस्था उभारण्यावर विशेष भर देण्यात येईल. तसेच अपघातांचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटर उभारण्याचा प्रस्ताव देखील आहे.

advertisement

वाहतूक कोंडीसह इंधनाची बचत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. वाहनांचा वेळ वाचेल आणि इंधनाचीही बचत होईल. यासोबतच प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. रस्ते आणि वाहतूक सुधारल्यामुळे उद्योगांचे काम अधिक सुरळीत होईल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली चाकण–तळेगाव परिसरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: चाकण-तळेगावची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मास्टर प्लॅन तयार, डेडलाईन ठरली!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल