मध्य रेल्वे विभागांतर्गत पुणे, सोलापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर अशा अनेक विभागांमध्ये वंदे भारत गाड्या धावत आहेत. वाढत्या संख्येमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या देखभाल डेपोंवर मोठा ताण येत आहे. भविष्यात आणखी काही वंदे भारत गाड्या सुरू होण्याची शक्यता असल्याने, त्यांची देखभाल दुरुस्ती वेळेवर आणि जलद गतीने होण्यासाठी हे डेपो आवश्यक आहेत.
advertisement
या योजनेअंतर्गत, पुण्यातील घोरपडी कोचिंग आणि मेंटेनन्स डेपोचे आता वंदे भारत कोचिंग डेपोमध्ये रूपांतर केले जाणार आहे. तसेच, मुंबईतील वाडीबंदर आणि नागपूरमधील अजनी कोचिंग डेपोचे देखील रूपांतर वंदे भारत एक्सप्रेस कोचिंग डेपोमध्ये केले जाईल. एकट्या घोरपडी डेपोसाठी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या डेपोमध्ये वंदे भारतच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक स्वतंत्र लाइन, तसेच 'अमृत भारत एक्स्प्रेस' आणि एलएचबी (LHB) कोचसाठी स्वतंत्र लाइन टाकली जाणार आहे. यामुळे रेल्वे गाड्यांच्या मेंटेनन्स प्रणालीला मोठी गती मिळणार आहे.
