Pune News: प्रचाराच्या घाईत अपघात! राष्ट्रवादी आमदाराच्या भरधाव मर्सिडीजनं शिरूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीला उडवलं

Last Updated:

Shirur Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारने एका चिमुकलीला धडक दिली. कारने ४ वर्षांच्या चिमुकल्या बालिकेला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे.

भीषण अपघात (प्रतिकात्मक फोटो)
भीषण अपघात (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याहून शिरूरकडे निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारने एका चिमुकलीला धडक दिली. कारने ४ वर्षांच्या चिमुकल्या बालिकेला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे. रविवारी दुपारी पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथे हा अपघात झाला. या अपघातात शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय ४) ही बालिका गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पुण्यामध्ये पुढील उपचार सुरू आहेत.
बालिकेची प्रकृती चिंताजनक
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार कटके हे वाघोलीहून शिरूरकडे त्यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून जलद गतीने येत होते. बोऱ्हाडे मळा येथील हुंदाई शोरूमसमोर शुभ्रा बोऱ्हाडे ही बालिका अचानक एका दुसऱ्या कारच्या आडून महामार्ग ओलांडत होती. यावेळी ती थेट आमदार कटके यांच्या कारसमोर आली. चालकाने त्वरित ब्रेक दाबला, परंतु गाडीचा वेग जास्त असल्याने शुभ्राला जोरदार धडक बसली. धडकेमुळे ती चेंडूसारखी हवेत उडून काही फूट अंतरावर रस्त्यावर आदळली. या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली असून, तिचे दात पडून जबड्याला जबर जखम झाली आहे.
advertisement
अपघात होताच आमदार कटके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने कारमधून उतरून शुभ्राला उचलले. कटके यांनी स्वतः दुसऱ्या कारमधून शिरूर गाठलं. तर त्यांच्याच कारमधून शुभ्राला तातडीने शिरूरच्या वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी त्वरित पुण्याला हलवण्यात आलं आहे.
advertisement
पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आमदाराच्या कारने बालिकेला उडवल्याची बातमी संपूर्ण शिरूर शहरात पसरली असतानाही, पोलीस प्रशासनाने मात्र या घटनेची लपवाछपवी केल्याचा गंभीर आरोप होत आहे. 'घटनेबद्दल आम्हाला ना रुग्णालयातून खबर मिळाली, ना कोणी तक्रार करण्यासाठी आलं,' असं पोलिसांनी सांगितलं. शिरूर शहरात या प्रकारावरून 'आमदारांकडून पोलिसांवर दबाव टाकण्यात आला आहे का?' अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
advertisement
सध्या शिरूर नगर परिषदेचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला असून, आजी-माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. प्रचाराला वेळेत पोहोचण्याच्या घाईगडबडीत नेत्यांची वाढलेली धावपळ एका सर्वसामान्य बालिकेच्या जीवावर बेतल्याची खंत शहर आणि तालुक्यात व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: प्रचाराच्या घाईत अपघात! राष्ट्रवादी आमदाराच्या भरधाव मर्सिडीजनं शिरूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीला उडवलं
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement