पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सतत काही ना काही वाद होत आहे. मराठीचा
मुद्दा ऐरणीवर आला असून ठिकठिकाणी ही प्रकरण वाढत चालली आहेत. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. या धोरणाला सर्व स्तरावरून विरोध झाला असून आता मराठी भाषेसाठी मराठी माणूस धडपड करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे वाद सुरू असताना पुण्यात एका मुजोर गुजराती तरुणाचा व्हिडीओ व्हायरल समोर आला आहे.
advertisement
पुण्यातून समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये आलिशान कारमध्ये बसलेला गुजराती तरुण हा आपण गुजराती असून हिंदीच बोलणार, पण मराठी बोलणार नाही, असं आक्रमकपणे बोलताना दिसतोय. त्याचा मुजोरपणा कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाला आहे.
पुण्यात एका तरुणांकडून 'मी मराठी बोलणार नाही मी गुजराती आहे', असं बोलण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुण्यात या तरुणाने एका ठिकाणी त्याचं वाहन पार्क केलं होतं त्या ठिकाणी सुट्टे पैसे देण्यावरून पार्किंग चालक आणि या तरुणांमध्ये वाद सुरू झाला आणि याचा रूपांतर थेट मराठी विरुद्ध हिंदी भाषा यामध्ये झाले. आधी या तरुणाने मराठी बोलण्यास नकार देत मी गुजराती आहे असं म्हणल्यामुळे अनेकांच्या भावना यावेळी दुखावल्या गेल्या.
नेमकं काय संभाषण झालं या व्हिडीओमध्ये?
व्हिडीओमध्ये तरुण बोलताना दिसतोय की, हिंदीमध्ये बोल पण मराठी हिंदी असलं काही बोलू नको, मी गुजराती आहे, तू काय करणार, जर पुढच्याला तुम्ही ओळखत नसाल तर मग कशाला बोलायचं, तुम्ही काय करणार, मी मराठी बोलणार नाही तर व्हिडिओ काढणारा म्हणतो, तू मराठीत बोल, तू मोठ्या बापाची अवलाद असशील.., तू मराठीमध्ये बोल, त्यावेळी कारमध्ये असलेला तो तरुण म्हणतो, आता तर मी मराठीत बोलतच नसतो, त्यानंतर वाद पेटला आहे.
अखेर तरुणाने माफी मागितलीच
या गुजराती भाषिक तरुणाला मराठीऐवजी हिंदीमध्ये बोलल्यामुळे, काही स्थानिक लोकांनी त्याला जाहीरपणे माफी मागण्यास भाग पाडले. नेमका हा व्हिडिओ पुणे शहरातल्या कुठल्या भागाचा आहे हे समजलेलं नसलं तरी सुद्धा या व्हिडिओची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.
हे ही वाचा :
