नेमका प्रकार काय?
सिंहगड कॅम्पस परिसरात राहणारी पीडित महिला १४ डिसेंबर रोजी परिसरातून जात असताना, अचानक आलेल्या टोळक्याने तिला गाठले. हल्लेखोरांमध्ये तीन महिलांचाही समावेश होता. या सर्वांनी मिळून पीडितेला अमानुष मारहाण केली आणि संधी साधून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले. या भीषण हल्ल्यामुळे पीडित महिला प्रचंड दहशतीखाली होती.
advertisement
सोशल मीडियावर मैत्री, तरुणासाठी पुण्यातील मुलीनं घर सोडून गाठलं कोल्हापूर, पण पुढं नको ते घडलं
या घटनेमुळे महिला इतकी हादरली होती की, तिने भीतीपोटी काही दिवस कोणालाही याबद्दल सांगितलं नाही. अखेर हा प्रकार समोर आल्यानंतर तिच्या पतीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तीन महिलांसह पाच अनोळखी पुरुषांविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, महिलेला अशाप्रकारे मारहाण करून लुटल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
चाकण परिसरात तरुणावर हल्ला
दुसऱ्या एका घटनेत चाकण परिसरात एका तरुणावर केवळ माहिती दिली नाही म्हणून प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आपला मित्र कोठे आहे, हे न सांगितल्याच्या रागातून तीन जणांनी मिळून एका २३ वर्षीय तरुणाला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
