काय आहे मॉडेल?
पुण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "पुण्यात जमिनीवर रस्ते रुंदीकरण करण्याला आता मर्यादा आल्या आहेत. शहराच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ ९% भाग रस्त्यांसाठी उपलब्ध आहे, तर वाहनांची संख्या रस्ते क्षमतेच्या दुप्पट झाली आहे. अशा स्थितीत रहदारीचा ताण कमी करण्यासाठी भूमिगत रस्ते नेटवर्क हाच दीर्घकालीन पर्याय आहे."
advertisement
प्रकल्पाचे प्रमुख मुद्दे:
येरवडा-कात्रज जोडणी: हा बोगदा शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारा मुख्य दुवा ठरेल. यामुळे शहरातील अत्यंत गजबजलेल्या रस्त्यांवरील रहदारी जमिनीखालून वळवली जाईल.
५४ किमीचे जाळे: हा केवळ एक बोगदा नसून एकूण ५४ किलोमीटरचे भुयारी जाळे असणार आहे. यामध्ये जगताप डेअरी, सिंहगड रोड, पाषाण, कोथरूड, औंध, संगमवाडी आणि खडकी यांसारख्या प्रमुख भागांचा समावेश असेल.
३२,००० कोटींचा खर्च: या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे ३२,००० कोटी रुपये असून, राज्य सरकारकडून यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
रिंग रोडशी जोडणी: हा भूमिगत मार्ग अंतर्गत रिंग रोडला जोडला जाईल, ज्यामुळे महामार्गांकडे जाणारी वाहतूक अधिक सुलभ होईल.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) या प्रकल्पाचा 'पूर्व-व्यवहार्यता अहवाल' पूर्ण केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर हा अहवाल 'पुम्टा' (PUMTA) समोर ठेवला जाईल. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल.
