TRENDING:

'खाऊ देतो' म्हणत मंदिराच्या माडीवर नेलं अन् 3 मुलांसोबत घाणेरडं कृत्य; घरी येताच मुलाची अवस्था पाहून आई हादरली

Last Updated:

एका मुलाला त्याने 'खाऊ देतो' असे आमिष दाखवून मंदिराच्या माडीवर नेले आणि तिथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात कडूस येथे तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. आता या प्रकरणातील नराधमाला राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. आरोपी नरेश विजय देशनेहरे (रा. कडूस) याला दोषी ठरवत न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
पाच वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा  (प्रतिकात्मक फोटो)
पाच वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

घटना काय?

हा अंगावर काटा आणणारा प्रकार मार्च २०१९ ते मे २०२० या कालावधीत कडूस येथील बौद्धवस्ती परिसरात घडला होता. आरोपी नरेश याने परिसरातील ९ वर्षांच्या एका आणि १० वर्षांच्या दोन चिमुरड्यांसोबत संतापजनक कृत्य करत विकृतीचा कळस गाठला. यातील एका मुलाला त्याने 'खाऊ देतो' असे आमिष दाखवून मंदिराच्या माडीवर नेले आणि तिथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

advertisement

असा उघड झाला प्रकार

अत्याचारानंतर पीडित मुलगा रडत घरी पोहोचला. आईने प्रेमाने विचारपूस केल्यानंतर मुलाने नराधम नरेशने केलेल्या कृत्याचा पाढा वाचला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आरोपीने अशाच प्रकारे इतर दोन मुलांवरही अत्याचार केल्याचे समोर आले. सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

या निकालामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, लहान मुलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवणे आणि त्यांना सुरक्षिततेबद्दल जागरूक करणे किती गरजेचे आहे, हे या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
'खाऊ देतो' म्हणत मंदिराच्या माडीवर नेलं अन् 3 मुलांसोबत घाणेरडं कृत्य; घरी येताच मुलाची अवस्था पाहून आई हादरली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल