11 ते 17 जानेवारी 2025 म्हणजेच भारतात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. दरवर्षी एक आठवडा लोकांच्या सुरक्षित प्रवासासाठी जनजागृती केली जाते. पुण्यातील आयटी इंजिनिअर असलेले आर्य कुमार यांनी एक वेगळाच आदर्श घडवला आहे. आर्य कुमार हे एकदा जर्मनी इथं कामा निमित्ताने गेले होते. त्यावेळी त्यांनी ही सायकल पाहिली आणि पुण्याची वाहतूक कोंडी यातून मार्ग काढता येईल, अशी आयडिया सुचली. मग काय, आर्य कुमार हे मागील एक वर्षांपासून सायकलने ऑफिसला जाण्याचा प्रयोग सुरू केला, तो आजही सुरूच आहे. रोज ते सांगवी ते हिंजवडी असं 12 किलोमीटरचा प्रवास 30 मिनिटांमध्ये पार करतात.
advertisement
"सायकल वापरण्याचे अनेक फायदे आहे. मुळात प्रदूषणाचा मुद्दा इथं येतच नाही. जरी वाहतूक कोंडी असली तरी सायकलीमुळे मी सहज पार करतो. एवढंच काय, ही सायकल घेऊन मेट्रोमध्ये प्रवास देखील करू शकतो. मी जेव्हा सायकलने प्रवास करतो, तेव्हा अनेक लोक माझ्याकडे आश्चर्याने बघतात. पण त्यांना देखील मी हेच सांगत असतो. एक नागरिक म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. जेणेकरून आपल्या भविष्यासाठी आणि वातावरणासाठी चांगल्या असतील" असंही आर्य कुमार यांनी सांगितलं.
फॉर व्हीलरमधून प्रवास करत एसी मधून जाऊ शकतो परंतु ही नॉर्मल इलेक्ट्रिक सायकल घेऊन जाताना एक वेगळा अनुभव आपण घेऊ शकतो . ही कमी खर्चात असून याचा मेंटेन्स खर्च ही कमी आहे. त्यामुळे सगळ्यांनी याचा वापर हा केला पाहिजे. वाहतुकीच्या समस्यांमधून तुम्हाला तुमची सुटका करून घ्यायची असेल तर तुम्ही सुद्धा आर्य कुमारप्रमाणे सायकल वापरू शकता आणि स्वतःची त्यातून सुटका करून घेऊ शकता.
#NationalHighwaysAuthorityofIndia #NHAI #MinistryOfRoadTransportAndHighways #MORTH
#NitinGadkari