TRENDING:

Rohit Pawar Vs Ajit Pawar : 'बारामतीत पैशांचा पाऊस' रोहित पवारांकडून आणखी एक VIDEO, म्हणाले भ्रष्टाचाराचं धरण..

Last Updated:

Rohit Pawar Vs Ajit Pawar : रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रात्रीच्या अंधारात एकजण पैसे वाटत असल्याचे पाहायला मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे. मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत डाव-प्रतिडाव सुरू आहेत. अशात बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांमध्ये पैशांचं वाटप झाल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली होती. आता आणखी एक व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अजित पवार यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.
आमदार रोहित पवार
आमदार रोहित पवार
advertisement

हा व्हिडीओ बारामती शहरातील असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेत जेवढे एपिसोड आहेत, त्यापेक्षाही जास्त एपिसोड कदाचित बारामती मतदारसंघात फुटलेल्या भ्रष्टाचाराच्या धरणाचे होतील असं वाटतंय, असा टोला रोहित पवार यांनी अजितदादांना लगावला आहे. अजितदादा घ्या, आणखी एक व्हिडिओ, असं म्हणत हा व्हिडीओ रोहित पवार यांनी अपलोड केला आहे. रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओत चौघेजण दिसत आहेत. यामध्ये एकजण नावे लिहून घेत आहेत. तर दुसरा पैसे वाटताना पाहायला मिळत आहे.

advertisement

वाचा - मतदाराने EVM मशीनवर पेट्रोल टाकून लावली काडी; सोलापुरातील खळबळजनक घटना

यापूर्वीही एक व्हिडीओ शेअर

या व्हिडीओत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसत आहे. घटनास्थळी पोलीसही उपस्थित होते. जवळच उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवलेले पैसेदेखील व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, बारामती मतदारसंघात चक्क पोलीस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस… दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या टीकेनंतर अजित पवार यांच्या गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Rohit Pawar Vs Ajit Pawar : 'बारामतीत पैशांचा पाऊस' रोहित पवारांकडून आणखी एक VIDEO, म्हणाले भ्रष्टाचाराचं धरण..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल