Solapur Loksabha : मतदाराने EVM मशीनवर पेट्रोल टाकून लावली काडी; सोलापुरातील खळबळजनक घटना

Last Updated:

Solapur Loksabha : सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनबाबत छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला.

News18
News18
सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभेसाठी आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उन्हाळा असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 8 वाजेपर्यंत सोलापूर लोकसभेसाठी बारा टक्के तर माढा लोकसभेसाठी दहा टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे ईव्हीएम मशीनबाबत छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून एका मतदाराने जाळण्याचा प्रयत्न केला.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे शांतपणे मतदारप्रक्रिया सुरू होती. अशात एका मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे ईव्हीएम मशीनटे थोडे नुकसान झालं आहे. या घटनेनंतर बागलवाडी येथे काही काळ मतदान प्रक्रिया शांत झाली होती. सांगोला येथील सहायक्क निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घडल्या घटनेबाबत बोलण्यास नकार दिला. नवीन ईव्हीएम मशीन आणून मतदानाला सुरुवात झाली. बागलवाडी मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.
advertisement
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, उज्वलाताई शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर त्यांच्यासह माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Loksabha : मतदाराने EVM मशीनवर पेट्रोल टाकून लावली काडी; सोलापुरातील खळबळजनक घटना
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement