अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवार
एकेकाळी राष्ट्रवादीचा अभ्यद्य गड आणि अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये येऊन रोहित पवारांनी शक्ती प्रदर्शन केलं आहे. रोहित पवारांनी आपले दंड थोपटत, कोणत्याही परिस्थितीत आपण शरद पवारांच्या विचारांवर आगामी निवडणुका लढणार आणि जिंकणार असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला. अर्थातच त्यांच्या आव्हान देण्याचा रोख होता तो अजित पवारांकडे.
advertisement
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तब्बल तीन महिन्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाचा शहर अध्यक्ष निवडण्यात आला. आता शरद पवारांच्या गटाचे शहर अध्यक्ष तुषार कामठे हे तरुण नेतृत्व असेल. मात्र, तुषार कामठे हे अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना आपल्याकडे वळवून पुतण्या रोहित पवारांनी काका अजित पवारांना शह दिल्ल्याच बोलल जात आहे. मात्र, रोहित पवार आज जे प्रयत्न करतायत ते स्वाभाविक असल्याचं सांगत निवडणुका बाबतीत अजून बरच पाणी पुलाखालून जायचं बाकी आहे असं म्हणत अजित पवार समर्थकांनी रोहित पवारांच्या आव्हानाला काडीचेही महत्व दिले नाही.
वाचा - Shivsena : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी एका आठवड्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
असं जरी असले तरी पिंपरी चिंचवडमध्ये काका-पुतण्यातील हा संघर्ष पेटणार हे निश्चित मानलं जातंय. कारण आपल्या विचाराशी प्रतारणा करून भाजपशी सलगी करणाऱ्या अजित पवार यांना शह देण्यासाठी थेट शरद पवार यांनीच रोहित पवार यांना पाठबळ दिल्याचं जाणकारांच म्हणण आहे. त्यामुळेच आगामी काळात पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला तर नवल वाटायला नको.