काय म्हणाले शरद पवार?
पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा हा एक गंभीर विषय आहे. चौकशी करून सत्य समाजासमोर ठेवलं पाहिजे. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य हे वैयक्तिक वक्तव्य होतं. सुप्रियाला तिचं स्वत:चं मत असू शकतं. तिने खूप सौम्य भूमिका मांडली होती. सरकारने समिती स्थापन केली आहे. प्रशासकीय गोष्टी वेगळ्या आणि कौटुंबिक गोष्टी वेगळ्या, असं शरद पवार म्हणाले आहे.
advertisement
पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही?
कुटूंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोण तेजवानी याबद्दल मला माहिती देखील नाही पण त्यांना शोधून काढावं, असंही शरद पवार म्हणाले. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही, याबाबत देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील, असंही शरद पवार म्हणाले आहेत. यावेळी शरद पवार यांनी मनसेसोबतच्या युतीवर देखील भाष्य केलं.
मनसे संदर्भात माविआने एकत्र बसून निर्णय घ्यावा - शरद पवार
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामील केलं जाणार का? असा सवाल शरद पवार यांना विचारल्यानंतर उत्तर दिलं. मनसे संदर्भात माविआने एकत्र बसून निर्णय घ्यावा, असं मत देखील शरद पवार यांनी मांडलं आहे. मनसे आणि माविआने मतचोरीविरुद्ध मुंबईमध्ये भव्य रॅली काढली होती.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
माझा पार्थवर विश्वास असून तो चुकीची गोष्ट करणार नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, मी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. रकार म्हणत आमची जमीन विकता येत नाही. तहसीलदार म्हणतात मी सही केली नाही. त्यामुळे नोंदणी झाली की नाही? नेमकं सरकार कोण चालवतं? आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवतो. माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या. त्यांची पहिली टर्म चांगली होती, अच्छे को अच्छा बोलना चाहिए, पण आता मुख्यमंत्र्यांना झालंय काय? इतका गोंधळ का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला होता.
