हा हल्ला इतका भयंकर होता की या हल्ल्यात सोन्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी हल्लेखोरांनी सोन्यासोबत असलेल्या एका मित्रावर देखील वार केले. आता या रक्तरंजित कांडाचं कारण समोर आलं आहे. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
प्रथमेश शंकर दारकू (२०), यश रवींद्र गायकवाड (१९), जानकीराम परशुराम वाघमारे (१८), महादेव पांडुरंग गंगासागरे (१९) आणि बालाजी आनंद पेदापुरे असं अटक केलेल्या आरोपींची नावं असून सर्वजण चंदननगरच्या बोराटे वस्ती परिसरातील रहिवासी आहेत.
advertisement
नेमका वाद काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून मयत सोन्या सकट आणि आरोपी यांच्यात वाद सुरू होता. एका प्रेम प्रकरणातून हा वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री लखन आणि आरोपी यांच्यात वाद पेटला होता. त्यानंतर त्यांची भांडणं झाली. भांडणं मिटवण्यासाठी लखन शनिवारी रात्री उद्यानात आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील होता. त्यावेळी लखनला मारण्यासाठी आरोपींनी उद्यानात दबा धरला. त्याला गार्डनमध्ये बोलवलं होतं.
आरोपी प्रथमेश दर्डू आणि यश गायकवाड आधीच हत्यारे घेऊन उद्यानात सकटची वाट बघत थांबले होते. सकट याला पाहताच आरोपींनी याच्यावर धारदार हत्याराने वार केले. हाता-पायावर, पोटावर, तोंडावर आणि डोक्यावर सुमारे 20 ते 25 वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
