दरम्यान अपघातापूर्वी हा अल्पवयीनं आरोपी पबमध्ये जाऊन दारू पिल्याचं समोर आलं, त्यानंतर अल्पवयीन मुलाला दारू कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. त्यानंतर आता पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील आणखी एका पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला आहे.
advertisement
पुण्यातील 'बॉलर' पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पार्टी सुरू असतानाच उत्पादन शुक्ल विभागानं पबवर छापा टाकला. रजिस्टर मेंटेन न करणे, प्रिमायसेसच्या बाहेर दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणे, अशी अनेक कारण दाखवत या पब वर कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
May 26, 2024 4:18 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! पुण्यातील आणखी एका पबमधून अल्पवयीन मुलांना दारूचा पुरवठा; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
