TRENDING:

भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, 31 मे पर्यंत मंदिर राहणार बंद, कारण काय?

Last Updated:

मंदिर परिसरातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी 9 एप्रिलपासून 31 मे 2026 पर्यंत तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दर 12 वर्षांनी होणारा कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक असल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. नाशिक येथील त्र्यंबकेश्वरकडे येणारे भाविक मोठ्या संख्येने श्री क्षेत्र भीमाशंकरला भेट देऊ शकतात. तसेच जून महिन्यातील पावसाचे प्रमाण आणि मंदिर परिसरातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी 9 एप्रिलपासून 31 मे 2026 पर्यंत तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय; भीमाशंकर मंदिर 31 मे 2026 पर्यंत बंद 
प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय; भीमाशंकर मंदिर 31 मे 2026 पर्यंत बंद 
advertisement

भाविकांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासनाकडून विविध कामे हाती

भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. भीमाशंकर याठिकाणी जुन्या सभामंडपाचे क्षेत्र पुरेसे नसल्याने नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच पायरीमार्गाचे कामही केले जात आहे. सध्या मुख्य सभामंडपाचे 75% बांधकाम पूर्ण झाले असून, घुमटाचे कामही चालू आहे. मंदिर परिसरात मोठे दगड, बांधकाम साहित्य आणि यंत्रसामुग्री असल्यामुळे, चालू बांधकामाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी मंदिर खुले ठेवणे सुरक्षित नाही. याशिवाय, प्रवेशमार्गावरील पायरीमार्गाचे काम सुरू असल्यामुळे सध्या मंदिराकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.

advertisement

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असल्यामुळे, जून ते सप्टेंबर या कालावधीत याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे, विकास कामे त्यापूर्वी जलदगतीने पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, 31 मे पर्यंत मंदिर राहणार बंद, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल