TRENDING:

Pune News: स्वच्छ पूणे करण्यासाठी महापालिका आयुक्त मैदानात, सफाई कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेत आखल्या उपाययोजना

Last Updated:

Swachh Survekshan: आगामी एका वर्षात पुणे शहराला देशातील सर्वात ‘स्वच्छ शहर’ म्हणून गौरव मिळवून देण्याचा निर्धार पुणे महानगरपालिकेने केला आहे. त्यासाठी विशेष ‘स्वच्छतेचा पुणे पॅटर्न’ महापालिकेकडून आखण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आगामी एका वर्षात पुणे शहराला देशातील सर्वात ‘स्वच्छ शहर’ म्हणून गौरव मिळवून देण्याचा निर्धार पुणे महानगरपालिकेने केला आहे. त्यासाठी विशेष ‘स्वच्छतेचा पुणे पॅटर्न’ म्हणजेच स्वच्छतेचा नवा आराखडा राबविण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. सध्या शहरात दिवसभर आणि रात्रीही स्वच्छतेचे काम सुरू असते. मात्र रात्री उशिरा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.
पुढील एक वर्षात पुणे शहर "स्वच्छ शहर"करण्याचा महापालिकेचा निर्धार..
पुढील एक वर्षात पुणे शहर "स्वच्छ शहर"करण्याचा महापालिकेचा निर्धार..
advertisement

रात्री उशिरा ऑन-फिल्ड काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विश्वास देत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील स्वच्छतेसंदर्भातील सद्यस्थिती, कचरा व्यवस्थापनातील अडचणी, ऑन- फिल्ड कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना या विषयांवर आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि वरिष्ठ मुकादम उपस्थित होते.

advertisement

बैठकीत कर्मचाऱ्यांनी कामकाजातील अडचणींबाबत माहिती दिली. काही ठिकाणी नागरिकांच्या असहकारामुळे, नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, झोपडपट्ट्यांमध्ये कचऱ्याचा अनियमित साठा होणे, अरुंद रस्त्यांमुळे कचरा गाड्यांना प्रवेश न मिळणे या समस्यांवर आयुक्तांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच, वाहतुकीतील अडथळे, वाहनांची अपुरी संख्या, पर्यायी गाड्यांची अनुपलब्धता आणि मनुष्यबळाची तूट यामुळे काही ठिकाणी स्वच्छता कार्यात विलंब होत असल्याचेही लक्षात आले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नातवाने पूर्ण केलं आजी-आजोबांचं स्वप्न, पिंपरी-चिंचवडमधील यश बनला CA
सर्व पहा

आयुक्तांनी या समस्या दूर करून कार्यक्षमतेत वाढ करण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या नव्या ‘पुणे पॅटर्न’ अंतर्गत तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, प्रत्येक वॉर्डात स्वच्छतेचे मानक उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमामुळे पुणे शहर  स्वच्छ शहर म्हणून देशातील सर्वोच्च स्थान मिळवेल, असा आत्मविश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: स्वच्छ पूणे करण्यासाठी महापालिका आयुक्त मैदानात, सफाई कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेत आखल्या उपाययोजना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल