पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडलेली पाहायला मिळत आहे.वाढत्या थंडीमुळे नागरिकांमध्ये सर्दी, ताप आणि खोकला आजारांनी त्रस्त पाहायला मिळत आहे.सोबतच पुण्यात वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. धूर धूळ आणि धुक्यामुळे नाक, घसा आणि श्वासनलिकांमध्ये सूज आल्याने निमोनिया आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
डॉ.अविनाश भोंडवे यांनी सांगितले की,"शहरातील वाढती थंडी आणि प्रदूषणामुळे हवेत विषाणू आणि जीवाणूंचा संसर्ग वाढल्याने "वॉकिंग निमोनिया"चा धोका वाढतो. सतत अनेक दिवस खोकला येणे, फुफुसावर सुज येणे या सारखी लक्षणे "वॉकिंग निमोनिया"मध्ये आढळून येतात."
advertisement
काय आहेत लक्षणे
वॉकिंग निमोनिया ग्रस्त रुग्णाला दमट आणि कोरडा खोकला येतो. सोबतच ताप येणे, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे यासारख्या समस्या निर्माण होतात. थकवा आणि अशक्तपणा देखील रुग्णांमध्ये पाहायला मिळतो.
अशी घ्या खबरदारी
सकाळी लवकर जॉगिंग, कामाला जाणाऱ्या आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी फुल आणि थंडीपासून बचाव करणारे कपडे घालावे. मास्कचा वापर करावा, बाहेरून आल्यानंतर हात धुणे, शिंकताना आणि खोकताना तोंड झाकणे हे उपाय प्रभावी ठरतात. खोकला 7 ते 10 दिवसांपेक्षा अधिक राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.