जर तुम्ही पुण्यात राहता आणि फिरायला जायचा विचार आहे तर पुण्याजवळील असे काही पर्यटन स्थळ आहेत तिकडे तुम्ही नक्की मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत जाऊ शकता.
पुण्यापासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर असलेले लोणावळा आणि खंडाळा हे लोकप्रिय हिल स्टेशन्स आहेत. येथे वातावरण नेहमी थंडगार आणि शुद्ध आहे. टायगर पॉइंट, भुशी धरण आणि राजमाची किल्ला ही ठिकाणे निसर्गप्रेमींना आकर्षित करतात.
advertisement
पावना लेक - पावना धरणाजवळील परिसर म्हणजे निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी स्वर्गासमान आहे. पावना लेकवभोवती फेरफटका हा एक वेगळाच अनुभव आहे.
राजगड किल्ला- सह्याद्रीच्या रांगा मध्ये वसलेला राजगड किल्ला हे इतिहासप्रेमींना नक्कीच आवडेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा अनुभवण्यास आणि किल्ल्याच्या रम्य निसर्गरम्य परिसरातील ट्रेकसाठी हे ठिकाण आदर्श आहे. किल्ल्याच्या शिखरावरून संपूर्ण परिसराचे दृश्य पाहणे एक अविस्मरणीय अनुभव आहे.
खडकवासला धरण- पुण्यापासून 30 किलोमीटरवर असलेले खडकवासला धरण हे खासकरून सहलीसाठी योग्य आहे. पाणलोट, धरणाचे पाणी आणि आसपासचे निसर्गरम्य परिसर हे दिवसभराच्या सहलीसाठी उत्तम आहेत. फोटोग्राफीच्या दृष्टीने हे ठिकाण फार प्रसिद्ध आहे.