एकवीरा पायथा मंदिराच्या यात्रा दरम्यान वाहतूक बंद
मावळ तालुक्यातील कार्ला फाटाकडून एकवीरा पायथा मंदिराकडे जाणारी वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. या मार्गावर जाणारी वाहने अग्रसेन हॉटेल वाहनतळ, लाजवंती महाविद्यालय वाहनतळ आणि दुर्गा परमेश्वरी वाहनतळ येथे वळविली जाणार आहे. 25 मार्चच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 26 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वडगाव फाटा ते कुसगाव बु. टोलनाका दरम्यान जड वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत वाहने वडगाव फाटा ते मुंबई-पुणे महामार्ग मार्गे कुसगाव बु. टोलनाका, मुंबई या मार्गाने वळवली जातील.
advertisement
जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कुसगाव बु. टोलनाका ते वडगाव फाटा दरम्यान जड वाहतूक बंद राहणार आहे. या दरम्यान वाहने कुसगाव बु. टोलनाका ते वडगाव फाटा मुंबई-पुणे महामार्गा मार्गे वळवली जातील. भाविकांची हलकी वाहने वगळता जड आणि अवजड सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिले आहेत.






