प्रवाशांनो लक्ष द्या, चैत्री यात्रा उत्सवानिमित्त मावळमध्ये वाहतुकीमध्ये बदल, पर्यायी मार्ग कोणते?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. 26 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
पुणे: मावळ तालुक्यातील लोणावळा ग्रामीण हद्दीतील वेहेरेगावी येथे 26 मार्चला श्री एकविरा देवी चैत्री यात्रा उत्सव-2026 पार पडणार आहे. या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. 26 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आणि वाहनचालकांनी नियम पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एकवीरा पायथा मंदिराच्या यात्रा दरम्यान वाहतूक बंद
मावळ तालुक्यातील कार्ला फाटाकडून एकवीरा पायथा मंदिराकडे जाणारी वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. या मार्गावर जाणारी वाहने अग्रसेन हॉटेल वाहनतळ, लाजवंती महाविद्यालय वाहनतळ आणि दुर्गा परमेश्वरी वाहनतळ येथे वळविली जाणार आहे. 25 मार्चच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 26 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वडगाव फाटा ते कुसगाव बु. टोलनाका दरम्यान जड वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत वाहने वडगाव फाटा ते मुंबई-पुणे महामार्ग मार्गे कुसगाव बु. टोलनाका, मुंबई या मार्गाने वळवली जातील.
advertisement
जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कुसगाव बु. टोलनाका ते वडगाव फाटा दरम्यान जड वाहतूक बंद राहणार आहे. या दरम्यान वाहने कुसगाव बु. टोलनाका ते वडगाव फाटा मुंबई-पुणे महामार्गा मार्गे वळवली जातील. भाविकांची हलकी वाहने वगळता जड आणि अवजड सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 9:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
प्रवाशांनो लक्ष द्या, चैत्री यात्रा उत्सवानिमित्त मावळमध्ये वाहतुकीमध्ये बदल, पर्यायी मार्ग कोणते?









