advertisement

Tamil Nadu Opinion Poll: तामिळनाडूत होणार थरार, सत्ताधारी अन् विरोधकांच्यात फक्त 10 जागांचे अंतर; किंगमेकरचे नाव समोर आले

Last Updated:

Tamil Nadul Election Opinion Poll: तामिळनाडूमध्ये 2026 च्या विधानसभा निवडणुकीत DMK आणि AIADMK यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होण्याचा अंदाज आहे. ओपिनियन पोलनुसार स्टॅलिन आणि पलानीस्वामी यांच्यातील सामना निकाल ठरवणारा ठरू शकतो.

News18
News18
नवी दिल्ली/चेन्नई: पश्चिम बंगालसह देशातील 5 राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत दक्षिण भारतातील तामिळनाडू निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. राज्यात कोणाची सत्ता येणार हे 4 मे रोजी स्पष्ट होणार होईल. मात्र त्याआधी आलेल्या एका ओपिनियन पोलने सर्वांची झोप उडवली आहे. राज्यातील 234 विधानसभेच्या जागेसाठी 23 रोजी मतदान होणार आहे.
तामिळनाडूमध्ये 2026 च्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची आणि थेट दोन आघाड्यांमधील लढत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. CNN-News18 साठी VoteVibe च्या ‘Vote Tracker’ ओपिनियन पोलनुसार सत्ताधारी DMK आघाडी आणि AIADMK आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
DMK सरकारबाबत मिश्र प्रतिक्रिया
गेल्या पाच वर्षांत DMK सरकारच्या कामगिरीबाबत जनतेत स्पष्ट मतभेद दिसून येतात. सुमारे 40% लोकांनी सरकारचे काम चांगले किंवा खूप चांगले असल्याचे म्हटले तर जवळपास 39% लोकांनी ते खराब किंवा अतिशय खराब असे मत व्यक्त केले.
advertisement
महिला मतदार पुरुषांच्या तुलनेत अधिक सकारात्मक दिसून आल्या, तर पुरुष मतदार अधिक टीकात्मक होते. 55 वर्षांवरील मतदारांमध्ये समाधानाची पातळी जास्त होती, तर 18 ते 24 वयोगटातील तरुण अधिक नाराज दिसले.
सामाजिक गटांमध्ये SC/दलित मतदारांनी सरकारला सर्वाधिक सकारात्मक प्रतिसाद दिला. तर उच्चवर्णीय हिंदू मतदारांमध्ये नाराजी अधिक दिसली. अल्पसंख्याक समुदायात समाधानाची पातळी सरासरीपेक्षा जास्त होती.
advertisement
मुख्यमंत्री पदासाठी चुरस
मुख्यमंत्री पदासाठीची शर्यतही अत्यंत चुरशीची आहे. विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन यांना 39.9% पाठिंबा असून ते आघाडीवर आहेत, तर पलानीस्वामी यांना 37.5% समर्थन मिळाले आहे.
लिंग आणि वयोगटानुसार मतांमध्ये फरक दिसतो. पुरुष मतदार पालनीस्वामी यांना पसंती देतात तर महिला मतदार स्टॅलिन यांच्या बाजूने आहेत. विरोधी महिला मतदारांमध्ये AIADMK आणि TVK यांच्यात मतविभाजन दिसते. तरुण मतदारांमध्ये विशेषतः 18–24 वयोगटात Vijay यांना लक्षणीय पाठिंबा मिळतो. वयोवृद्ध मतदार स्टॅलिन यांच्या बाजूने एकवटलेले दिसतात तर मध्यमवयीन मतदार पालनीस्वामींकडे झुकतात.
advertisement
SC/दलित मतदार स्टॅलिन यांना पसंती देतात, तर OBC आणि उच्चवर्णीय हिंदू मतदार पालनीस्वामी यांच्या बाजूने आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांचा स्पष्ट कल DMK कडे आहे.
निवडणुकीवर प्रभाव टाकणारे मुद्दे
  • मतदारांच्या दृष्टीने मद्यपान आणि अमली पदार्थांचा प्रश्न (20.1%) हा सर्वात मोठा मुद्दा ठरला आहे. त्यानंतर महिलांची सुरक्षा (17.8%), कायदा व सुव्यवस्था (17.3%) आणि बेरोजगारी (15.5%) हे प्रमुख मुद्दे आहेत.
  • तरुण आणि मध्यमवयीन मतदारांमध्ये व्यसनाधीनता मोठा प्रश्न आहे. तर बेरोजगारीचा मुद्दा तरुण आणि SC/दलित मतदारांमध्ये अधिक प्रभावी आहे.
  • भ्रष्टाचार हा मुद्दा उच्चवर्णीय हिंदूंमध्ये अधिक महत्त्वाचा आहे. तर महिलांची सुरक्षा सर्वच गटांमध्ये महत्त्वाची ठरते.
  • भाषा लादण्याचा मुद्दा 55 वर्षांवरील मतदारांमध्ये महत्त्वाचा ठरतो. तर महागाई हा मुद्दा मुस्लिम मतदारांमध्ये अधिक प्रभावी आहे. संघराज्य रचनेवरील धोका हा तुलनेने कमी महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे.
advertisement
द्विपक्षीय लढतीचा प्रभाव
सुमारे 41.2% मतदारांना ही निवडणूक DMK आणि AIADMK यांच्यातील थेट लढत वाटते. 18.7% लोकांना ती काही प्रमाणात त्रिकोणी वाटते. तर केवळ 12% लोकांना ती पूर्णपणे त्रिकोणी लढत वाटते. यावरून TVK अजून ठोस तिसरा पर्याय बनलेला नाही, असे दिसते.
कोणाची सत्ता येणार?
या प्री-पोल सर्व्हेनुसार एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुनेत्र कळघम (DMK) आघाडीला 234 सदस्यीय विधानसभा निवडणुकीत 113 ते 123 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या आघाडीत काँग्रेस, CPI आणि CPI(M) यांचा समावेश आहे.
advertisement
तर प्रतिस्पर्धी एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील AIADMK आघाडी ज्यात BJP चा समावेश आहे त्यांना 106 ते 116 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे निकाल अत्यंत जवळचा आणि अनिश्चित राहण्याची शक्यता आहे.
अभिनेता-राजकारणी विजयच्या तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाला पहिल्यांदाच निवडणुकीत 2 ते 8 जागा मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
2021 चा संदर्भ आणि 2026 ची स्थिती
2021 च्या विधानसभा निवडणुकीत DMK आघाडीने 158 जागांसह स्पष्ट विजय मिळवला होता आणि एम.के. स्टॅलिन मुख्यमंत्री बनले होते. पाच वर्षांनंतर 2026 च्या निवडणुकीत मात्र परिस्थिती खूपच बदललेली दिसते. ताज्या ओपिनियन पोलनुसार तामिळनाडूमध्ये यंदा अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Tamil Nadu Opinion Poll: तामिळनाडूत होणार थरार, सत्ताधारी अन् विरोधकांच्यात फक्त 10 जागांचे अंतर; किंगमेकरचे नाव समोर आले
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement