TRENDING:

Pune Traffic : पुणेकरांनो लक्ष द्या! वाकड-हिंजवडी पूलावर वाहतूकीत मोठा बदल; वाचा सविस्तर

Last Updated:

Wakad Hinjewadi Bridge Update : पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड-हिंजवडी पूल वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीक अवर्समध्ये एकेरी करण्यात येणार आहे. मुंबई-बंगळुरु महामार्गावरही काही बदल लागू होणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : वाकड आणि हिंजवडी परिसरातील दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि वाढती वाहने यामुळे वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न झाला आहे. आयटी पार्क, औद्योगिक वसाहत आणि मोठ्या प्रमाणावर वाढलेली निवासी वसाहत यामुळे दररोज हजारो गाड्या या मार्गावरून जात असतात. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन नियोजन केले आहे.
News18
News18
advertisement

वाहतूक विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार वाकड-हिंजवडी पूल आता प्रायोगिक तत्त्वावर पीक अवर्समध्ये एकेरी मार्ग म्हणून वापरला जाणार आहे. सकाळी वाकडहून हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत पूल वाकड ते हिंजवडी या दिशेने तीन मार्गिका खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, हिंजवडीहून वाकडकडे जाणाऱ्यांसाठी केवळ एकच मार्गिका उपलब्ध असेल.

advertisement

संध्याकाळच्या वेळी परिस्थिती याउलट असेल. कारण कामावरून परतताना बहुतांश वाहने हिंजवडीहून वाकडकडे येतात. त्यामुळे संध्याकाळी वाकडच्या दिशेने तीन मार्गिका तर हिंजवडीकडे जाणाऱ्यांसाठी फक्त एक मार्गिका खुली ठेवली जाईल.

हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी सांगितले की, हा निर्णय नागरिकांच्या सोयीसाठी घेतला असून त्याचा परिणाम काही दिवस काळजीपूर्वक पाहिला जाईल. जर यामुळे वाहतूक कोंडीत लक्षणीय घट झाली तर पुढील काळात ही व्यवस्था कायम ठेवली जाऊ शकते.

advertisement

दरम्यान, वाकड आणि हिंजवडी परिसरातील मुंबई-बंगळुरू महामार्गावरील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आले आहेत. कात्रज-देहूरोड बायपासवरील भुजबळ चौकात दोन्ही बाजूंना तात्पुरती बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. त्यामुळे आता महामार्गावर थेट चढ-उतार करण्याऐवजी नागरिकांना केवळ चौकातूनच प्रवेश किंवा बाहेर पडता येणार आहे. या निर्णयामुळे अनधिकृत आणि धोकादायक कटिंगवर प्रतिबंध होईल आणि अपघातांची शक्यता कमी होईल असा पोलिसांचा विश्वास आहे.

advertisement

पोलिस उपायुक्त  विवेक पाटील यांनी सांगितले की, हे सर्व बदल प्रायोगिक स्वरूपात राबवले जात आहेत. नागरिकांना काही अडचणी जाणवल्यास त्याबाबत अभिप्राय घेऊन पुढील नियोजनात आवश्यक सुधारणा केल्या जातील.

नवीन नियमानुसार सकाळी हिंजवडीहून वाकडकडे जाणाऱ्यांना पूल वापरता येणार नाही. त्याऐवजी गाड्यांनी डावीकडे वळून सयाजी अंडरपासमधून यू-टर्न घेऊन गंतव्यस्थान गाठावे लागणार आहे. पोलिसांनी यासाठी दिशादर्शक फलक तसेच वाहतूक सहाय्यकांची नेमणूक केली आहे.

advertisement

वाकड-हिंजवडी परिसरात अनेक वर्षांपासून उड्डाणपुलांची कमतरता, अरुंद रस्ते आणि नियोजनशून्य विकासामुळे वाहतूक कोंडी कायम आहे. आयटी पार्कमधील लाखो कर्मचारी रोज या मार्गावरून प्रवास करत असल्याने सकाळ-संध्याकाळ प्रचंड गाड्यांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा हा प्रयोग महत्त्वाचा मानला जात आहे.

या बदलामुळे काही दिवस नागरिकांना थोडा त्रास होऊ शकतो. मात्र, दीर्घकाळासाठी वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, नियोजनाचा परिणाम पुढील काही आठवड्यांत स्पष्ट होईल.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic : पुणेकरांनो लक्ष द्या! वाकड-हिंजवडी पूलावर वाहतूकीत मोठा बदल; वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल