पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लाईन 4 (खराडी-हडपसर -स्वारगेट-खडकवासला) आणि लाईन 4 अ (नळस्टॉप - वारजे -माणिकबाग) यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पाला जवळपास खर्च 9,857,85 कोटी आहे. या दोन्ही कॉरिडॉरचे एकूण लांबी 31.636 किलोमीटर असेल. या संपूर्ण मार्गिकेवर 28 स्थानके असतील. ही नवी मेट्रो लाईन पुण्याच्या आयटी हब, औद्योगिक क्षेत्र, मोठ्या शैक्षणिक संस्था आणि दाट लोकवस्ती असलेल्या निवासी भागांना जोडतील. त्यामुळे सर्वांनाच त्या मेट्रोचा फायदा होणार आहे.
advertisement
खराडी आयटी पार्कपासून खडकवासल्याच्या पर्यटन क्षेत्रापर्यंत सोबतच हडपसरचा औद्योगिक क्षेत्रापासून हे मार्ग वारजेपर्यंत सर्व शहराच्या पूर्व दक्षिण आणि पश्चिम भागांना जोडतील. लाईन 4 आणि 4 अ स्वारगेट, खराडी बायपास आणि नळस्टॉप लाइन 2 येथे कार्यरत आणि मंजूर कार्यरत कॉरिडोरला देखील जोडले जातील. या मार्गामुळे सोलापूर रोड, मगरपट्टा रोड, सिंहगड रोड, कर्वे रोड आणि मुंबई बंगलोर महामार्ग यासारख्या सर्वात व्यस्त मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मेट्रोमुळे पुण्यातील काही पर्यायी मार्गांनाही याचा फायदा होणार आहे.
