नेमकी घटना काय?
मयत महेश लक्ष्मण साठे (वय ३२, रा. भवरापूर) हे आपल्या दुचाकीवरून (MH 12 CJ 9551) जात असताना, आरोपींनी त्यांच्या ह्युंदाई आय-२० (MH 12 QY 7888) कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, महेश साठे यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी अक्षय दशरथ साठे (३२) आणि गोकुळ नाना कोकरे (२३) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा (कलम १०३(१)) दाखल केला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जमीन गट क्र. १०४ संदर्भातील जुना वाद आणि नदीवरील पाण्याच्या मोटार दुरुस्तीवरून काही दिवसांपूर्वी अक्षय साठे आणि अभिषेक साठे यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. याच वादाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी अपघाताचा बनाव रचून महेश साठे यांना ठार मारल्याचा आरोप फिर्यादी लक्ष्मण सोपान साठे यांनी केला आहे.
मुख्य आरोपी अक्षय साठे याच्यावर यापूर्वी २०१९ मध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वाहन अपघातासंदर्भात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसरा आरोपी गोकुळ कोकरे याचा कोणताही पूर्वइतिहास नाही. उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण कांबळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
