TRENDING:

'दोघे जण आले आणि त्यांनी दादावर...', आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या; सांगितला आंदेकर टोळीचा थरार

Last Updated:

आयुषच्या खुनाचा कट बंडुअण्णा आंदेकर आणि इतर आरोपींनी रचल्याचं कल्याणी कोमकरचं यांनी फिर्यादीत लिहिलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  एकीकडे गणेशोत्सवामुळे भक्तीमय वातावरण आहे. अशात गँगवारचा भडका उडाला आहे. मागील वर्षभरापासून दबा धरून बसलेल्या वनराज आंदेकरच्या टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंदचा खून केला आहे. गोळ्या झाडून गोविंदची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा बदला आंदेकर टोळीनं आयुष कोमकरचा खून करूनच घेतला आहे. आयुषच्या हत्येचा एकमेव साक्षीदार आहे, तो म्हणजे आयुषचा 12 वर्षाचा लहान भाऊ... लहान भावाला ट्युशनवरून घेऊन आलेल्या आयुषवर घराच्या खाली पार्किंगमध्येच गोळ्या झाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Ayush Komkar
Ayush Komkar
advertisement

आयुष कोमकरची आई आणि वनराज आंदेकरची बहीण कल्याणी गणेश कोमकरने या प्रकरणी तक्रार केली आहे. आयुषची आई कल्याणीने दिलेल्या माहितीनुसार, आयुषला एक लहान भाऊ असून त्याचे नाव आर्णव आहे. आर्णव रोज संध्याकाळी कॅम्पमध्ये सलीम सरांकडे ट्युशनला जात असे, मात्र त्याची ट्युशन घरापासून लांब असल्याने आयुष संध्याकाळी भावाला घेण्यासाठी गेला. घराच्या खाली आल्यानंतर आयुष हा पार्किंगमध्ये गाडी लावण्यासाठी गेला त्यावेळी त्याच्यावर दोन जणांनी येऊन गोळ्या झाडल्या.

advertisement

कल्याणी कोमकरने नेमकं फिर्यादीत काय म्हटले?

याच हत्येचा बदला आयुष याच्या खुनाद्वारे घेण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष हा नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी 5 सप्टेंबरला सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आलेला. तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता, त्या वेळी दबा धरून बसलेल्या अमन खान, यश पाटील यांनी त्याच्यावर 11 गोळ्या झाडल्या..आयुषच्या खुनाचा कट बंडुअण्णा आंदेकर आणि इतर आरोपींनी रचल्याचं कल्याणी कोमकरचं यांनी फिर्यादीत लिहिलंय.

advertisement

आयुषच्या लहान भावाने काय म्हटलं? 

आयुषच्या लहान भावाने दिलेल्या माहितीनुसार, दादा आणि ट्युशन सुटल्यानंतर गाडीवर पार्किंगमध्ये आलो, मी गाडीवरुन खाली उतरलो आणि दादाने गाडी पार्क केली. तेवढ्यात पाठीमागून दोन मुले पळत आली आणि त्यांनी माझ्या दादावर समोरून गोळ्या झाडल्या. त्यानंतर दादा खाली पडला

घटनेनंतर पार्किंगमध्ये मोठी गर्दी

आयुषवर गोळ्या झाडल्यानंतर पार्किंगमध्ये मोठी गर्दी जमली होती. इमारतीतील एका व्यक्तीने आयुषच्या आईला फोन करून मुलाला कोणीतरी मारहाण केली असे सांगितले. आयुषची आई खाली आली तर लहान मुलगा अर्णव रडत होता आणि मोठा मुलगा आयुष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर जवळच्या डॉक्टरांना तपासणीसाठी बोलवले त्यांनी तपासणी केली असता ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले.

advertisement

शिक्षणाचं माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचीही राजधानी होतेय की काय? असा सवाल निर्माण करणाऱ्या घटना सातत्यानं घडतायेत. आता तर पुण्यात गँगवॉर आणि त्यातून खूनसत्र सुरू झालंय. कारण, माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरचा खून केलाय. या प्रकरणी पोलिसांनी नाना पेठेतील डोके तालीम परिसरातील आंदेकर टोळीच्या 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आयुष कोमकर याची आई कल्याणी गणेश कोमकर यांच्या फिर्यादीवरुन समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय.

advertisement

हे ही वाचा :

'आयुषचा जीव घेतला', गुंड बंडू आंदेकरची लेक पोलीस ठाण्यात; बापाविरोधात दिली तक्रार

मराठी बातम्या/पुणे/
'दोघे जण आले आणि त्यांनी दादावर...', आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या; सांगितला आंदेकर टोळीचा थरार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल