'आयुषचा जीव घेतला', गुंड बंडू आंदेकरची लेक पोलीस ठाण्यात; बापाविरोधात दिली तक्रार

Last Updated:

मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरनं स्वत: नातवाचाच खून केल्याच्या या धक्कादायक घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय

News18
News18
पुणे : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवारचा जो भडका उडालेला, त्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेतला गेला. हा बदला आंदेकर टोळीनं आयुष कोमकरचा खून करूनच घेतला आहे. मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरनं स्वत: नातवाचाच खून केल्याच्या या धक्कादायक घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. आयुष कोमकरची आई आणि वनराज आंदेकरची बहीण कल्याणी गणेश कोमकरने तक्रार केली आहे.
शिक्षणाचं माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचीही राजधानी होतेय की काय? असा सवाल निर्माण करणाऱ्या घटना सातत्यानं घडतायेत. आता तर पुण्यात गँगवॉर आणि त्यातून खूनसत्र सुरू झालंय. कारण, माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरचा खून केलाय. या प्रकरणी पोलिसांनी नाना पेठेतील डोके तालमी परिसरातील आंदेकर टोळीच्या 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
advertisement

कोणाकोणावर केला गुन्हा दाखल?

म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर
त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर
पुतण्या शिवम आंदेकर
नातू स्वराज वाडेकर
तुषार वाडेकर
अभिषेक आंदेकर
शिवराज आंदेकर
वृंदावनी वाडेकर
लक्ष्मी आंदेकर
अमन युसुफ पठाण उर्फ खान
यश सिद्धेश्वर पाटील
आयुष कोमकर याची आई कल्याणी गणेश कोमकर यांच्या फिर्यादीवरुन समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय.
advertisement
मागच्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून खून करण्यात आला होता. वनराज आंदेकरची बहीण संजीवनी,तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी वाद झाले होते. याच कौटुंबिक, संपत्ती,तसंच वर्चस्वाच्या वादातून वनराज आंदेकर याचा खून झाल्याचं पोलिसांच्या दोष आरोपात नमूद करण्यात आलेलं. या प्रकरणात पोलिसांनी 16 आरोपींना अटक करण्यात आली होती.
advertisement

वनराज आंदेकर प्रकरणात कोणाला अटक केली?

सोमनाथ गायकवाड
अनिकेत दूधभाते
वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर
पती जयंत कोमकर आणि
दीर गणेश कोमकर

कल्याणी कोमकरने नेमकं फिर्यादीत काय म्हटले?

याच हत्येचा बदला आयुष याच्या खुनाद्वारे घेण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष हा नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी 5 सप्टेंबरला सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास तो दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आलेला. तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता, त्या वेळी दबा धरून बसलेल्या अमन खान, यश पाटील यांनी त्याच्यावर 11 गोळ्या झाडल्या..आयुषच्या खुनाचा कट बंडुअण्णा आंदेकर आणि इतर आरोपींनी रचल्याचं कल्याणी कोमकरचं यांनी फिर्यादीत लिहिलंय.
advertisement
मराठी बातम्या/पुणे/
'आयुषचा जीव घेतला', गुंड बंडू आंदेकरची लेक पोलीस ठाण्यात; बापाविरोधात दिली तक्रार
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement