शाळेची वार्षिक फी 1,13,73,780 रुपये; फक्त 450 विद्यार्थी, अभ्यास नाही, लावल्या जातात 'या' सवयी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
World Most Expensive School: स्वित्झर्लंडमधील इंस्टिट्यूट ले रोझे ही जगातील सर्वात महागडी शाळा असून तिला ‘स्कूल ऑफ किंग्ज’ म्हटलं जातं. तलावाशेजारील राजवाडा, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, सॉना-हॉट टब अशा शाही सुविधांमुळे ही शाळा विद्यार्थ्यांचं स्वप्नवत ठिकाण आहे.
जिनिव्हा: शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान मिळवणे किंवा परीक्षा पास करणे इतकेच मर्यादित राहिलेले नाही. तर ते आता प्रतिष्ठा आणि जीवनशैलीचे प्रतीक बनले आहे. जगात अनेक शाळा आहेत काही खूप जास्त शुल्क आकारून विद्यार्थ्यांना आलिशान सुविधा देतात. तर काही कमी शुल्क घेऊन फक्त मूलभूत शिक्षण देतात. पण जगातील सर्वात महागडी शाळा कोणती आहे आणि ती कुठे आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
‘किंग्जची शाळा’ कुठे आहे?
स्वित्झर्लंडमध्ये असलेले इंस्टिट्यूट ले रोझे (Institut Le Rosey) हे जगातील सर्वात महागडे आणि प्रतिष्ठित बोर्डिंग स्कूल मानले जाते. 1880 मध्ये पॉल-एमिल कार्नल यांनी स्थापन केलेल्या या शाळेला ‘स्कूल ऑफ किंग्ज’ असेही म्हटले जाते. आपल्या समृद्ध इतिहासामुळे आणि प्रतिष्ठेमुळे या शाळेत जगभरातील अनेक राजघराण्यांची आणि उच्चभ्रू कुटुंबांची मुले शिकली आहेत.
advertisement

सर्वात महाग का आहे ही शाळा?
मीडिया रिपोर्ट्सनुसार या शाळेची वार्षिक फी सुमारे 1,13,73,780 रुपये आहे. या शुल्कात निवास, भोजन, पेय, शिक्षण आणि संगीत, खेळ व घोडेस्वारी यांसारख्या अतिरिक्त गोष्टींचा समावेश आहे.
advertisement

सुविधा आणि शिक्षण
या शाळेत सुमारे 60 देशांमधून आलेले 450 विद्यार्थी शिकतात. येथे जवळपास 120 शिक्षक आहेत. याचा अर्थ प्रत्येक 3 किंवा 4 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असतो. विद्यार्थ्यांना येथील आंतरराष्ट्रीय बॅकलॉरिएट (IB) आणि फ्रेंच बॅकलॉरिएट यांसारख्या जागतिक दर्जाच्या अभ्यासक्रमांचा लाभ मिळतो. आधुनिक वर्गखोल्या, मोठे क्रीडा केंद्र, स्विमिंग पूल आणि टेनिस कोर्ट विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देतात.
advertisement

शाळेत तलावाशेजारील एक राजवाडा, स्टीम आणि सॉना रूम्स, हॉट टब, टेनिस कोर्ट आणि सेलिंग बेस यांसारख्या शानदार सुविधा आहेत. रात्रीच्या जेवणाच्या वेळी विद्यार्थ्यांना औपचारिक पोशाख घालणे बंधनकारक आहे. ज्यात मुलांना ब्लेझर आणि टाय घालण्याची अपेक्षा असते. या शाळेला ‘स्कूल ऑफ किंग्ज’ म्हटले जाते, कारण तिच्या प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक राजघराण्यांचे तसेच रॉकफेलर्स आणि रोथ्सचाइल्ड्स यांसारख्या प्रसिद्ध घराण्यांचे सदस्य आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 9:38 PM IST
मराठी बातम्या/मनी/
शाळेची वार्षिक फी 1,13,73,780 रुपये; फक्त 450 विद्यार्थी, अभ्यास नाही, लावल्या जातात 'या' सवयी