Dahisar Fire : मुंबईत इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू, 5-6 जणांची प्रकृती गंभीर

Last Updated:

मुंबईच्या उपनगरातील दहिसर पुर्व परिसरातील शांतीनगर भागातील न्यू जन कल्याण 23 मजली इमारतीत भीषण आगीची घटना घडली होती. ही घटना दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली होती.

Dahisar Fire
Dahisar Fire
Dahisar Fire News : विजय वंजारा, मुंबई : मुंबईच्या उपनगरातील दहिसर पुर्व परिसरातील शांतीनगर भागातील न्यू जन कल्याण 23 मजली इमारतीत भीषण आगीची घटना घडली होती. ही घटना दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली होती. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला सायंकाळ पर्यंत यश आले आहे.या घटनेत एका 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर गुदमरल्यामुळे 5-6 जण गंभीर असल्याची माहिती आहे. या नागरीकांवर सध्या उपचार सूरू
दहिसरच्या एस.व्ही. रोडवरील शांती नगर येथील 23 मजली न्यू जनकल्याण सोसायटीच्या सातव्या मजल्यावर आगीची घटना घडली होती.शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती आहे. तळमजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंतच्या तळघरात असलेल्या इलेक्ट्रिक डक्ट, वायरिंग, केबल्स आणि दोन सामान्य इलेक्ट्रिक मीटर केबिनमध्येच पसरली होती.दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.या घटनेची माहिती पोलिसांसह अग्निशमन दलाला मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने महिला, पुरुष आणि मुलांसह एकूण 36 जणांना वाचवण्यात यश आले होते.
advertisement
आज दुपारी मुंबईतील दहिसर (पूर्व) येथील एस.व्ही. रोडवरील शांती नगर येथील न्यू जनकल्याण सोसायटीच्या २३ मजली इमारतीत भीषण आग लागली आग तळमजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंतच्या तळघरात असलेल्या इलेक्ट्रिक डक्ट, वायरिंग, केबल्स आणि दोन सामान्य इलेक्ट्रिक मीटर केबिनमध्येच पसरली होती.
या घटनेत आगीच्या धुरामुळे गुदमरून एका 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच 5-6 जण गंभीर आहेत. 1 पुरूष गंभीर आहे आणि 5 णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. नॉर्दर्न केअर रुग्णालयात 10 जण दाखल आहेत, ज्यामध्ये 4 वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. प्रगती आणि शताब्दी रुग्णालयात प्रत्येकी एक जण दाखल आहे.
advertisement
मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने (MFB) सांगितले की, संध्याकाळी 6.10 वाजता सुमारे तीन तासांत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. दहिसर पोलीस सर्व रुग्णालयांमधून जखमींची संपूर्ण माहिती गोळा करत आहेत जेणेकरून त्यांची सुरक्षितता आणि उपचार सुनिश्चित करता येतील. आगीचे कारण काय आहे याचा तपास अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. वेळेवर मदत पोहोचल्याने मोठी जीवितहानी टळली, परंतु जखमींच्या काळजीकडे अजूनही विशेष लक्ष दिले जात आहे.
advertisement

मुंबईत आगीमुळे 'इतक्या' लोकांचा मृत्यू ?

2021 मध्ये मुंबईत 4065 आगीच्या घटनांची नोंद झाली. या वर्षी 19 लोकांचा मृत्यू झाला आणि 173 लोक जखमी झाले. 2022 मध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली परंतु मृतांचा आकडा कमी झाला. या वर्षी 4417 घटनांची नोंद झाली आणि 13 लोकांचा मृत्यू झाला. 2023 मध्ये मृतांचा आकडा खूप जास्त होता. या वर्षी
advertisement
5074 आगीच्या घटना घडल्या आणि 33 लोकांचा मृत्यू झाला आणि 300 जण जखमी झाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dahisar Fire : मुंबईत इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू, 5-6 जणांची प्रकृती गंभीर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement