दुकानदारानं पाठ फिरवली आणि.... सोन्याच्या दुकानात दोन महिलांनी अशी उडवली अंगठी, वारंवार Video पाहूनही लक्षात येणार नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
दुकानदाराने अंगठ्यांचे डबे उघडून त्यांना दाखवायला सुरुवात केली. त्या दोघी अंगठ्या पाहण्याचं नाटक करत असतानाच, त्यांनी हा प्रकार केला.
मुंबई : आजकाल सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात, जे पाहून लोक थक्क होतात. काही व्हिडिओ मजेदार असतात, काही भावनिक तर काही इतके धक्कादायक की लोकांनाही विश्वास बसत नाही. अलीकडे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात दोन महिला अतिशय चलाखीने सोन्याची अंगठी चोरताना दिसतात. विशेष म्हणजे त्यांनी ही चोरी अशी सफाईदारपणे केली की सुरुवातीला दुकानदारालाही काहीच कळलं नाही.
दिल्लीच्या लक्ष्मीनगर भागातील एका ज्वेलरी दुकानात दोन महिला अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. दुकानदाराने अंगठ्यांचे डबे उघडून त्यांना दाखवायला सुरुवात केली. त्या दोघी अंगठ्या पाहण्याचं नाटक करत असतानाच, दुकानात काम करणारी व्यक्ती काही क्षणांसाठी मागे वळते आणि नेमकं तेव्हाच त्यापैकी एक महिला सोन्याची खरी अंगठी आपल्या खिशात ठेवते आणि तिच्या जागी नकली अंगठी ठेवते.
advertisement
CCTV कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार
हा सगळा प्रकार काही सेकंदांमध्येच झाला. त्या महिलेनं इतक्या वेगात आणि चतुराईनं अंगठी बदलली की जर दुकानात CCTV कॅमेरा नसता, तर कुणालाही यावर विश्वास बसला नसता. दुकानदाराला सुरुवातीला काहीच शंका आली नाही. मात्र नंतर जेव्हा फुटेज पाहिलं गेलं तेव्हा सगळं सत्य उघड झालं.
35 सेकंदात संपलं सगळं, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ
सुमारे 35 सेकंदांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. X (पूर्वी ट्विटर) वर @mktyaggi या युजरनं तो शेअर करत लिहिलं “कमाल की तकनीक रहती है चोरों और ठगों की भी.” या पोस्टला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत.
advertisement
कमाल की तकनीक रहती है चोरों और ठगों की भी…
सोने की असली अंगूठी की जगह, नकली रख दी, लेकिन CCTV ने सब रिकॉर्ड कर लिया।
📍लक्ष्मीनगर, दिल्ली pic.twitter.com/TpCRjrMYf8
—
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2025 4:08 PM IST
मराठी बातम्या/Viral/
दुकानदारानं पाठ फिरवली आणि.... सोन्याच्या दुकानात दोन महिलांनी अशी उडवली अंगठी, वारंवार Video पाहूनही लक्षात येणार नाही


