'ताई मी जातो पण माझ्या बायकोला अन् मुलीला सोडू नको', बहिणीला व्हिडिओ कॉल करत भावाने मृत्यूला कवटाळले; पुण्यात खळबळ

Last Updated:

आत्महत्येच्या दिवशी मोठ्या मुलीने नितीनच्या छातीवर लाथ मारली आणि पत्नी तसेच दोन मुलींनीही अपमानास्पद वर्तन केले.

News18
News18
पुणे : पत्नी आणि मुलींच्या त्रासाला कंटाळून पर्वती येथील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या म्हाडााच्य एका वरिष्ठ लिपिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महत्त्वाचे म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी बहिणीला व्हिडीओ कॉल करत आता मी जातो आहे, पण यांना सोडू नको ताई, असे म्हणत जीवन संपवलं. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. पर्वती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव नीतिन साळवे आहे. आत्महत्येअगोदर पती- पत्नीमध्ये जोरदार वाद झाला आणि घराबाहेर पडत टोकाटे पाऊल उचलले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ माजली असून नातेवाईक संतप्त झाले आहेत.

शेवटच्या कॉलमध्ये काय म्हणाले बहिणीला?

नितीन साळवे हे मुंबई येथील म्हाडा कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते.पुण्याला त्यांचे कुटुंब राहत होते, ते फक्त शनिवार आणि रविवारी पुण्यात राहत असत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. नितीन साळवे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या बहीण पूनम उमेश कांबळे यांना त्रास असह्य होतोय असे म्हटले होते. बहिणीला व्हिडीओ कॉल करत आता मी जातो आहे, पण यांना सोडू नको ताई असे म्हटले होते. त्यानंतर बहिणीने पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणताही प्रतिसाद दिला नाही. बहिणीने नितीनच्या पत्नी आणि मुलींवर गंभीर आरोप केले आहेत.
advertisement

बहिणीचे गंभीर आरोप 

बहिण म्हणाली की, नितीनला त्याची पत्नी आणि दोन मुली सतत त्रास देत होत्या.ज्यावेळी नितीन घरी यायचा त्यावेळी कोणत्या ना कोणत्या कारणावरून घरात रोज भांडणं होत असे. नितीनच्या पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध होते. आत्महत्येच्या दिवशी मोठ्या मुलीने नितीनच्या छातीवर लाथ मारली आणि पत्नी तसेच दोन मुलींनीही अपमानास्पद वर्तन केले. त्यामुळेच नितीनने मला शेवटचा व्हिडिओ कॉल करून आत्महत्या केली, असा आरोप त्यांनी केला आहे.दरम्यान या प्रकरणाबाबत मृत नितीन साळवे यांच्या पत्नीने कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'ताई मी जातो पण माझ्या बायकोला अन् मुलीला सोडू नको', बहिणीला व्हिडिओ कॉल करत भावाने मृत्यूला कवटाळले; पुण्यात खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement