...तर वादच निर्माण झाला नसता, नीलम गोऱ्हेंचा धंगेकरांना पाठिंबा, मोहोळांच्या अडचणी वाढवल्या
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पुणे भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार करूनही आणि एकनाथ शिंदे यांनी समज देऊनही रविंद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावरील हल्ले सुरूच ठेवले आहेत.
पुणे : जैन मंदिर व्यवहारामध्ये पारदर्शकता असती तर वादच निर्माण झाला नसता, असे विधान करीत शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी करीत पक्षाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी उभारलेल्या लढ्याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारले तर त्याला समर्पक उत्तर देणे गरजेचे आहे, मात्र प्रश्नच विचारू नये अशी भूमिका घेणे चुकीचे असल्याचेही गोऱ्हे म्हणाल्या.
जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून रविंद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सनसनाटी आरोप केले. पुणे भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार करूनही आणि एकनाथ शिंदे यांनी समज देऊनही रविंद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावरील हल्ले सुरूच ठेवले. मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मंत्रिपदाचा गैरवापर करून सुरू असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. धंगेकर-मोहोळ यांच्या वादात फडणवीस-शिंदे यांनी मध्यस्थी करूनही धंगेकरांच्या टीकेची धार कमी होत नाहीये. या प्रकरणात आता नीलम गोऱ्हे यांनीही उडी मारून धंगेकर घेत असलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
advertisement
...तर वादच निर्माण झाला नसता, नीलम गोऱ्हे यांच्याकडून धंगेकरांना खुला पाठिंबा
जैन मंदिर व्यवहारामध्ये पारदर्शकता असती तर वादच निर्माण झाला नसता असं सांगतानाच लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारले तर त्याला समर्पक उत्तर देणे गरजेचे आहे मात्र प्रश्नच विचारू नये अशी भूमिका घेणे चुकीचे असल्याचे सांगत नीलम गोऱ्हे यांनी रवींद्र धंगेकर यांना खुला पाठिंबा दिला.
advertisement
मुरलीधर मोहोळ यांनी चर्चा करायला एका व्यासपीठावर यावे
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी मला निरोप दिला आहे. पक्षाविरोधात न बोलता प्रवृत्तीवर बोला, असे त्यांनी मला सांगितले आहे. त्यांच्या सूचनेनुसार मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे, असे रविंद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले. तसेच मुरलीधर मोहोळ यांनी चर्चा करायला एका व्यासपीठावर यावे, मी त्यांच्यासमोर चर्चेला जायला तयार आहे, असे आव्हान धंगेकर यांनी दिले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 26, 2025 3:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तर वादच निर्माण झाला नसता, नीलम गोऱ्हेंचा धंगेकरांना पाठिंबा, मोहोळांच्या अडचणी वाढवल्या


