advertisement

मोठी बातमी! मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड, आठवड्यातील दुसरी घटना

Last Updated:

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे.

News18
News18
पुणे :  भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्याला उड्डाण घेण्यापूर्वीच बिघाड झाल्याचे निष्पन्न झालंय. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे दौऱ्यावर जाणार होत्या मात्र टेकऑफपूर्वीच हेलिकॉप्टरच्या पायलटला तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झालं. परिणामी पंकजा मुंडेंनी आपला दौरा रद्द केल्याची माहीत समोर आली आहे. दोन दिवसात दुसऱ्यांदा तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे.
पंकजा मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी साताऱ्याच्या दौऱ्यावर जाणार होत्या.साताऱ्याच्या पिंपोडेमध्ये पंकजा मुंडे प्रचार सभा घेणार होत्या. या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचारसभेसाठी पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरने जाणार होत्या. मात्र उड्डाणापूर्वी तांत्रिक कारणामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले.
advertisement

तांत्रिक बिघाड झाल्याने सातारा दौरा रद्द 

राज्यात नुकताच झालेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातानं अवघ्या महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या विमान अपघाताबाबत अनेकांनी या अपघातांवर संशय व्यक्त करत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. अशातच मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोनदा तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
advertisement

दोन दिवसापूर्वी छ. संभाजीनगरमध्ये काय झाले होते?

पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होत्या. मंगळवारी सकाळी पंकजा मुंडे या लातूर, धाराशिव आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील त्यांच्या नियोजित सभांसाठी हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावरून निघण्याच्या तयारीत होत्या. पण विमानात तांत्रिक बिघाड झाला होता.

हेलिकॉप्टर प्रवासाविषयी पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या? 

advertisement
माझी आई लँड झाली का? टेकऑफ झाली का विचारत असते. एवढी मोठी दुर्घटना झाली आहे
की सर्वांची मने हादरली आहेत, टेन्शन लोकांच्या मनात आहे. अनेक लोक मेसेज करत होते की
हेलिकॉप्टरमध्ये बसू नका. पण याशिवाय पर्याय नाही, कारण आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत
पोहोचायचं आहे. काही काळजी करायचं कारण नाही, काम तर चालत राहणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड, आठवड्यातील दुसरी घटना
Next Article
Gold Silver: 1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; दिग्गज एक्सपर्टने म्हणाला, मोठी उलथापालथ होणार
1 रुपयाचे सोने-चांदी खरेदी करू नका, किंमतीवर आलाय धक्कादायक अंदाज; मोठी उलथापालथ होणार
  • सोने खरेदीची घाई नको

  • अन्यथा होईल मोठे नुकसान

  • दिग्गज तज्ज्ञाचा खळबळजनक अंदाज

View All
advertisement